मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेतील बंडाची चाहूल शरद पवारांना आधीच लागली होती!
Nationalist Congress Party (NCP) Chief Sharad Pawar
Nationalist Congress Party (NCP) Chief Sharad Pawar (HT_PRINT)
22 June 2022, 11:14 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 June 2022, 11:14 IST
  • या बंडाळी बद्दल शरद पवार यांनी किमान चार ते पाच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता आणि त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या इतर मंत्र्यांना भेटण्यास सुरुवात करण्याचा सल्ला पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.

Maharashtra political crises शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या काही महिने आधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सेना आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ‘वाढत्या नाराजीबद्दल’ इशारा दिला होता. एवढेच नाही तर संभाव्य बंडाची शक्यता असल्याचेही संकेतही दिले होते.

ट्रेंडिंग न्यूज

एका मोठ्या राजकीय व्यक्तीने द इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. या बंडाळी बद्दल शरद पवार यांनी किमान चार ते पाच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला होता आणि त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या इतर मंत्र्यांना भेटण्यास सुरुवात करण्याचा सल्ला पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे तसेच पक्षातील असामान वागणूकीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. हा असंतोष पवार यांना जाणवला होता. त्यांनी ठाकरे यांना संभाव्य बंडाचा इशाराही दिला होता, पण उद्धव यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असे सूत्राने सांगितले.

शिवसेनेच्या नेत्यांनाही मुख्यमंत्र्यांची भेट नाकाराली जात होती. एवढेच काय तर पवारांनाही ठाकरेंसोबत अपॉइंटमेंट मिळू शकली नाही. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या या व्यवहारामुळे पवार नाराज होते, जे पक्षांमधील राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी वेळ देत नव्हते.

एका दुस-या सूत्रांनी सांगितले की, ‘पवार यांनी उद्धव यांना त्यांच्या पक्षातील वाढत्या असंतोषाबद्दलही चेतावणी दिली होती. उद्धव ठाकरे हे नियमितपणे संवाद साधत नाहीत, अशी अनेकांची तक्रार होती. तसेच महाविकास आघाडीच्या काही आमदारांनीही पवारांना भेटून या सदर्भात तक्रार केली होती. या सरकारमध्ये एकटे पणाची भावना येत असल्याचेही या आमदारांनी पवारांना सांगितले होते.

हीच परिस्थीती काँग्रेसच्या आमदारांचीही होती. कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांनी किमान दोनदा दिल्लीत त्यांच्या हायकमांडकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांशी विकासकामांसंदर्भात बोलण्यासाठी अपॉइंटमेन्ट मिळत नाही, असे या नेत्याने सांगितले.

ठाकरे हे अनेक महत्वाच्या निर्णया संदर्भात आघाडीतील आमदारांची चर्चा न करता ते निर्णय घ्यायचे, यामुळेही नाराजीचे वातावरण होते. महाविकास आघाडीतील अनेक लहान पक्षांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. एका छोट्या पक्षातील आमदाराने सांगिलते की, माझ्या पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्र्यांना ४५ फोन केले होते. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

या आमदाराच्या म्हणण्यानुसार, छोट्या पक्षांना आणि अपक्षांना गृहीत धरले जात नव्हते. यामुळे संताप निर्माण झाला आणि अनेकांनी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांच्या वेळी सेनेपासून स्वत: ला दूर केले.

याबाबत सेनेच्या एका पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, आमदारांमध्ये अशी कोणतीही नाराजी असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे सातत्याने बैठका घेत होते, आमदार आणि मंत्र्यांशी वारंवार संवाद साधत होते, असे ते म्हणाले.