मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLA Salary: एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांचा मासिक पगार किती?, आमदाराच्या वेतनावरूनही रंगली चर्चा

MLA Salary: एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांचा मासिक पगार किती?, आमदाराच्या वेतनावरूनही रंगली चर्चा

Mar 13, 2023, 02:09 PM IST

    • Eknath Shinde Monthly Salary : यंदाचा अर्थसंकल्प सादर विधानसभेत करण्यात आला. त्यात अनेक विभागांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचा पगार किती आहे, हे तुम्हाला माहितीये का?
Eknath Shinde And Devendra Fadnavis Monthly Salary (HT_PRINT)

Eknath Shinde Monthly Salary : यंदाचा अर्थसंकल्प सादर विधानसभेत करण्यात आला. त्यात अनेक विभागांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचा पगार किती आहे, हे तुम्हाला माहितीये का?

    • Eknath Shinde Monthly Salary : यंदाचा अर्थसंकल्प सादर विधानसभेत करण्यात आला. त्यात अनेक विभागांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचा पगार किती आहे, हे तुम्हाला माहितीये का?

Devendra Fadnavis Monthly Salary : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राचं यंदाचं बजेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. त्यात शेतकरी आणि महिलांसह अनेक समाजघटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. फडणवीसांनी सादर केलेलं बजेट हे तुटीचा अर्थसंकल्प असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय जुन्या पेन्शन योजनेवरूनही राज्यातील राजकीय वातावरण पेटलेलं आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व निवडून दिलेले आमदारांना किती पगार असतो हे तुम्हाला माहितीये का?, चला तर जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पगार किती?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिन्याकाठी तीन लाख रुपयांहून अधिक पगार मिळतो. याशिवाय आमदार असल्याचा पगारही त्यांना वेगळ्या स्वरुपात मिळतो. इतकंच नाही तर मोफत निवास सुविधा, वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता आणि दूरध्वनी भत्त्याची सुविधाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पगारही तीन लाख रुपयांच्या घरात आहे. मुख्यमंत्र्यांना ज्या सुविधा मिळतात, त्याच सुविधा उपमुख्यमंत्र्यांना देखील मिळत असतात. त्यामुळं राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मासिक पगार साधारणत: प्रत्येकी सहा लाखांच्या घरात आहे. शिवाय अनेक प्रकारच्या सुविधा देखील त्यांना मिळतात.

आमदारांचा मासिक पगार किती?

महाराष्ट्रात निवडून आलेल्या आमदारांना १ लाख ८० हजारांचा मासिक पगार मिळतो. पगाराव्यतिरिक्त आमदारांना महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल सुविधेसाठीही शासनाकडून पैसे मिळतात. त्यामुळं आमदारांच्या पगाराचा आकडा सव्वादोन लाखांच्या घरात जातो. इतकंच नाही तर आमदारांना वर्षाकाठी पाच कोटी रुपयांचा स्थानिक विकासनिधी देखील शासनाकडून देण्यात येत असतो. माजी आमदारांना ५० हजार रुपयांची पेन्शन देण्यात येत असते.