मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेचं टेन्शन वाढलं? एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉट रिचेबल

शिवसेनेचं टेन्शन वाढलं? एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉट रिचेबल

Jun 21, 2022, 07:43 AM IST

    • विधान परिषदेत शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची काही मते फुटल्याचं चित्र समोर आलं होतं. 
मंत्री एकनाथ शिंदे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

विधान परिषदेत शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची काही मते फुटल्याचं चित्र समोर आलं होतं.

    • विधान परिषदेत शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले असले तरी त्यांची काही मते फुटल्याचं चित्र समोर आलं होतं. 

राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामध्ये महाविकास आघाडीची मते फुटल्याचं चित्र दिसून आलं. शिवसेनेचे (Shivsena) दोन्ही उमेदवार निवडून आले तरी त्यांची ३ मते फुटली. त्यातच आता शिवसेनेची अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. आता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले १३ आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर येतंय.

ट्रेंडिंग न्यूज

Beed Crime : बीडमध्ये इनोव्हामध्ये सापडली तब्बल एक कोटी रुपयांची कॅश; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Mumbai Crime: बीकेसीत बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड! ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

विधान परिषद निवडणुकीत दोन्ही उमेदवार विजयी झाले असले तरी काँग्रेससोबत शिवसेनेची मतेही फुटली आहेत. आता त्यावरूनच शिवसेनेत फुट पडतेय का अशी चर्चा रंगली आहे. रात्री निकालानंतर वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक पार पडली. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीत मतदानानंतर गुजरातला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत १३ आमदारसुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती समजते. काही आमदारांचे फोन नॉट रिचेबल लागले. आमदार संपर्काबाहेर असल्याचं कळताच वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावण्यात आली. मुंबई आणि आसपासच्या आमदारांची मध्यरात्री दोन वाजेपर्यंत बैठक सुरू होती. आज पुन्हा दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.