मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकारणाचा नवा अंक.. शिवसेनेविरोधात काँग्रेस-भाजप एकत्र? फडणवीसांचे सूचक ट्विट

राजकारणाचा नवा अंक.. शिवसेनेविरोधात काँग्रेस-भाजप एकत्र? फडणवीसांचे सूचक ट्विट

Jul 13, 2022, 08:17 PM IST

    • काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
शिवसेनेविरोधात काँग्रेस-भाजप एकत्र?

काँग्रेस नेतेमिलिंद देवरायांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

    • काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत ४० आमदारांना घेवून भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! पावसाचा यलो अलर्ट; ‘येथे’ उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना महाविकास आघाडीत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र असल्याचं चित्र होतं. पण काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांच्या टीकेची दखल घेवून देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ट्विटरवर प्रतिक्रिया देत आपण याबाबत निर्णय घेऊ,असं आश्वासन दिलं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र येणार की काय? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते बावनकुळे यांनी ही प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली होती. आता तीच भाषा काँग्रेस बोलत आहे.

 

मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी शिवसेनेकडून करण्यात आलेली वॉर्डरचना ही अनधिकृत किंवा अवैध आहे,असं म्हटलं आहे देवरा यांनी म्हटले आहे की, मुंबई महापालिका भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुक्तपणे आणि निष्पक्षपणे पार पडल्या पाहिजेत. केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी मुंबईच्या वॉर्डरचनांमध्ये फेरबदल करणे हे अनैतिक आणि राजघटनेच्या विरोधात आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि नव्याने वॉर्डरचवा व्हावी,असं आवाहन मिलिंद देवरा यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

"मिलिंद देवरा जी,सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मला उद्देशून तुमचे पत्र मिळाले. आम्ही तुमच्या भावना लक्षात घेतल्या आहेत आणि मुंबईकरांसाठी आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी तुमच्या चिंता दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू",असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न -

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर उघडणे टीका करत असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न आहे,असा आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवरा यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात दुरावा येणार का?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.