मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /   Ajit Pawar Corona Positive: अजित पवार यांना करोनाची लागण; म्हणाले, लवकरच…

Ajit Pawar Corona Positive: अजित पवार यांना करोनाची लागण; म्हणाले, लवकरच…

Jun 27, 2022, 04:44 PM IST

    • Ajit pawar tests Covid 19 Positive: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. 
Ajit Pawar

Ajit pawar tests Covid 19 Positive: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे.

    • Ajit pawar tests Covid 19 Positive: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाली आहे. 

Ajit Pawar Corona Positive: शिवसेनेतील बंडाळीमुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं असताना दुसरीकडं करोना संसर्गाचा धोकाही वाढत आहे. खुद्द राज्यातील नेते मंडळींनाही त्याचा फटका बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करोनाची लागण झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

अजित पवार यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'काल मी करोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

राज्यात सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळं नेत्यांच्या बैठका आणि भेटीगाठींचं सत्र सुरू झालं आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून स्वत: अजित पवार हे देखील अनेक बैठकांना उपस्थित होते. पत्रकारांशीही संवाद साधत होते. आता त्यांना करोनाचा संसर्ग झाल्यानं ते विलगीकरणात गेले आहेत.

तत्पूर्वी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचीही अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा