मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लग्नाच्या एक दिवस आधी १९ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता; अन् ७ दिवसानंतर..

लग्नाच्या एक दिवस आधी १९ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता; अन् ७ दिवसानंतर..

Jul 13, 2022, 06:16 PM IST

    • अमरावती जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवस आधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 
इनसेटमध्ये मृत तरुणी

अमरावती जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवस आधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    • अमरावती जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवस आधी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

अमरावती - प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरलेल्या एका नियोजित वधूचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. साक्षी संजय नेवारे असे मृत तरुणीचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील एका १९ वर्षीय तरुणीचे ६ जुलैला लग्न ठरलेले होते. मात्र, ही नियोजित वधू ५ जुलैच्या सायंकाळपासून घरापासून बेपत्ता झाली होती. यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप मृत तरुणीचे वडील संजय नेवारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी शिरजगाव कसबा पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

संजय सदाशिव नेवारे हे शिरजगाव कसबामध्ये गोवारीपुरा भागात राहतात. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांची मुलगी साक्षी ५ जुलैला सायंकाळी ४ ते ५ दरम्यान घराबाहेर गेली. तिचा मोबाइल घरीच होता. त्यामुळे ती कुठेतरी बाहेर गेली असेल, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र, त्यानंतर ती परत आलीच नाही. त्याच दिवसापासून ती दिसून न आल्यामुळे संजय नेवारे यांनी शिरजगाव पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाइकांकडूनही तिचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, १२ जुलैला गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या अंगावर अर्धवट कपडे व जीभ बाहेर आली असल्याचे पंचनामा करताना आढळले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा