मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : दसरा मेळाव्यात शिंदे Vs ठाकरे सामना; मुंबई पोलीस दल सतर्क, अ‍ॅक्शन प्लान तयार

Dasara Melava : दसरा मेळाव्यात शिंदे Vs ठाकरे सामना; मुंबई पोलीस दल सतर्क, अ‍ॅक्शन प्लान तयार

Oct 04, 2022, 08:52 PM IST

    • राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. यामुळे  मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे.
दसरा मेळाव्यात शिंदेVsठाकरे सामना

राज्यभरातूनशिवसैनिकमुंबईत येणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. यामुळे मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे.

    • राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. यामुळे  मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे.

Dasara melava : राज्यातील राजकारणासाठी उद्याचा दिवस महत्वाचा आहे. शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्यासाठी पहिल्यांदाच इतकी उत्सुकता ताणली गेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा उद्या (बुधवार) सायंकाळपासून सुरू होणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur Accident: भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू; नागपूर येथील घटना

Navi Mumbai: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून मुलीचे अश्लील फोटो केले व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा फोन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Mumbai Hospital Fire: मुंबईच्या कांदिवली येथील खासगी रुग्णालयाला आग, ४ जण होरपळले

राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून १० हजार वाहने भरून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. यामुळे मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कस लागणार आहे.  पोलिसांवरील ताणही वाढणार आहे.  त्यामुळेच दसरा मेळाव्यातील वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्त करत असताना हलगर्जीपणा व पक्षपातीपणा न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस उप आयुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रक जारी करत पोलीस दलाला  (Mumbai police action plan) हे आदेश दिले आहेत.

दसरा मेळाव्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्र्याच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायला सुरूवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ नये,यासाठी पोलिसांचाही कस लागणार आहे.

मुंबईमध्ये या दोन दसरा मेळाव्याशिवाय देवी विसर्जन मिरवणुकाही होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसी मध्ये पोलिसांनी चेन सिस्टीममध्ये बंदोबस्त केला आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राहावा,यासाठी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सऍप ग्रुपही बनवण्यात आला आहे.

दोन्ही दसरा मेळावे आणि नवरात्र विसर्जनासाठी मुंबईत ३,२०० उच्च अधिकारी, १५,२०० पोलीस कर्मचारी,१,५०० एसआरपीएफचे जवान, १,००० होमगार्ड,२० क्युआरटी टीम आणि १५ बीडीडीएस टीमचा समावेश आहे.