मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Section 144 Imposed : मुंबईत ‘या’ तारखेपर्यंत कलम १४४ लागू; जाणून घ्या काय राहणार सुरू काय बंद?

Section 144 Imposed : मुंबईत ‘या’ तारखेपर्यंत कलम १४४ लागू; जाणून घ्या काय राहणार सुरू काय बंद?

Dec 02, 2022, 11:17 PM IST

  • Mumbai Section 144 Imposed : मुंबईत ४ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरात अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. 

मुंबईत कलम १४४ लागू

Mumbai Section 144 Imposed : मुंबईत ४ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरात अनेक निर्बंध लादण्यात आले आहे.

  • Mumbai Section 144 Imposed : मुंबईत ४ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरात अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. 

मुंबईत रविवार ४ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येणा आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी मुंबईत कर्फ्यू लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, मुंबईत कर्फ्यू नाही,  तर  जमावबंदीचे कलम १४४ लागू होणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आल्याने संपूर्ण शहरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय जाहीर सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरात ४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीतही संपूर्ण शस्त्रबंदी लागू राहणार आहे. यासोबतच लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावरही बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जमावबंदीच्या काळात काय बंद राहणार -

  • मुंबईत १७ डिसेंबरपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल.
  • मोठे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार मेळावे, स्मशानभूमीच्या मार्गावर मिरवणूक,  कंपन्या,  क्लब,  सहकारी संस्था आणि इतर संस्थांच्या मोठ्या सभांना बंदी घालण्यात आली आहे.
  • न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल. याशिवाय शाळा-महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमधील सभांनाही बंदी घालण्यात आली आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.
  • मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
  • यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा