मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha : काँग्रेसला धक्का, संसदेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी खासदार रजनी पाटील निलंबित

Rajya Sabha : काँग्रेसला धक्का, संसदेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी खासदार रजनी पाटील निलंबित

Feb 10, 2023, 08:45 PM IST

    • Congress MP Rajni Patil : पीएम नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी घातलेल्या गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी रजनीताई पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे.
Congress MP Rajni Patil (HT)

Congress MP Rajni Patil : पीएम नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी घातलेल्या गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी रजनीताई पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे.

    • Congress MP Rajni Patil : पीएम नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी घातलेल्या गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी रजनीताई पाटलांवर कारवाई करण्यात आली आहे.

Congress MP Rajni Patil : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभा सचिवालयानं याबाबत निर्णय घेतला असून त्यामुळं आता उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळं आता राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यामुळं काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Mahuli Fort: माहुली गडावर ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत कोसळला, जखमी तरुणाची २२ तासानंतर सुटका

Mumbai Rape: लैंगिक संबंध ठेवल्यास नोकरी मिळेल; काळ्या जादूच्या नावाखाली बरोजगार महिलेवर बलात्कार, भोंदू बाबाला अटक

Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

नेमकं प्रकरण काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत असताना हिंडेनबर्ग प्रकरणावरून विरोधकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळाचा व्हिडिओ काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. खासदार पाटील हे व्हिडिओ शूट करत असल्याचं समजताच राज्यसभेचे सभागृह नेते पियूष गोयल यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्यसभा सचिवालयानं खासदार रजनीताई पाटील यांना अधिवेशन काळापुरतं निलंबित केलं आहे.

अधिवेशनासाठी काय पूर्ण टर्म निलंबित करा- पाटील

राज्यसभा सचिवालयानं संसदेतील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबित केल्यानंतर खासदार रजनीताई पाटील यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातून येते, त्यामुळं मला अधिवेशनासाठीच काय तर संपूर्ण टर्म निलंबित केलं तरी चालेल, परंतु ज्या पद्धतीनं भाजपनं सभागृहात अपमान केलाय तो आम्ही सहन करणार नसल्याचं खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या आहेत.