मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'आपले वारकरी आहेत, उपचाराचा खर्च मी करतो', मुख्यमंत्र्यांचा फोन; VIDEO VIRAL

'आपले वारकरी आहेत, उपचाराचा खर्च मी करतो', मुख्यमंत्र्यांचा फोन; VIDEO VIRAL

Jul 07, 2022, 11:58 AM IST

    • सांगलीत वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून २० हून अधिक वारकरी जखमी झाले होते. याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी थेट डॉक्टरांना कॉल करून उपचाराची माहिती घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो - पीटीआय)

सांगलीत वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून २० हून अधिक वारकरी जखमी झाले होते. याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी थेट डॉक्टरांना कॉल करून उपचाराची माहिती घेतली.

    • सांगलीत वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून २० हून अधिक वारकरी जखमी झाले होते. याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी थेट डॉक्टरांना कॉल करून उपचाराची माहिती घेतली.

सांगलीत (Sangli) कवठेमहाकाळ तालुक्यात वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून मंगळवारी अपघात झाला. या अपघातात २० हून अधिक वारकरी जखमी झाले आहेत. या अपघातातील सर्व जखमींवर कवठेमहाकाळ आणि मिरजेतील सरकारी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, या जखमी वारकऱ्यांवर उपचार करण्यासंदर्भात फोनवरून सूचना देत असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Weather Update:सोलापूर, अकोला तापले! ४४ डिग्री सेल्सिअसची नोंद! बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूरला पावसाचा अलर्ट

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

शाहुवाडी (Shahuwadi) तालुक्यातील पवार दिंडी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जात होती. तेव्हा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पीकअप जीप दिंडीत घुसली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. जीपखाली काही वारकरी सापडले होते. यातील जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णलयात नेण्यात आले. या वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी मिरजेच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून उपचाराबाबत सूचना दिल्या. गरज पडल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती मिळताच मिरजेच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला. ड़ॉक्टर रुपेश शिंदे यांना फोन करत त्यांनी उपचाराबाबत सूचनासुद्धा दिल्या. एकनाथ शिंदे म्हणाले की, "वारकऱ्यांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात नेण्याची गरज पडली तर न्या. आपले वारकरी आहेत, त्यांना काही कमी पडू देऊ नका. सगळा खर्च मी करतो."

आणखी एक व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ठाण्याच्या पोलिस आयुक्तालयातला हा व्हिडीओ आहे. महिला पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना तिला चक्कर आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याला पाण्याची बाटली दिली. तसंच खुर्चीवर बसायला सांगत तिच्यासोबत असलेल्यांना तिला रुग्णालयात न्या अशा सूचना दिल्या.