मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Prashant Bamb vs Teachers : भाजप आमदाराला फोनवरून धमकी; शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल!

Prashant Bamb vs Teachers : भाजप आमदाराला फोनवरून धमकी; शिक्षकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल!

Aug 27, 2022, 10:09 AM IST

    • Shillegaon Aurangabad Crime News : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी एका शिक्षकाच्या पत्नीविरोधात शिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Lasur Station Aurangabad Crime News (HT)

Shillegaon Aurangabad Crime News : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी एका शिक्षकाच्या पत्नीविरोधात शिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    • Shillegaon Aurangabad Crime News : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासोबत फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी एका शिक्षकाच्या पत्नीविरोधात शिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lasur Station Aurangabad Crime News : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रशांब बंब यांनी उपस्थित केल्यानंतर आता त्यावरून वाद पेटला आहे. कारण आता राज्यातील अनेक शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांनी फोन करून या प्रकरणाबाबत जाब विचारायला सुरुवात केली आहे. याच प्रकरणातून आता एका शिक्षकाच्या पत्नीनं फोन करून आमदार बंब (BJP MLA Prashant Bamb vs Teachers) यांना धमकी दिल्यानंतर गंगापूर तालुक्यातील शिल्लेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातील शिक्षक, ग्रामसेवक आणि शासकीय कर्मचारी मुख्यलयावर राहत नसल्याचा आरोप केला होता. याशिवाय हे कर्मचारी खोट्या कागदपत्रांच्या आधारावर सरकारकडून पैसे लाटत असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर एका शिक्षकासोबत आमदार बंब यांचा वाद झाल्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे.

शिक्षकाच्या पत्नीविरोधात शिल्लेगांव पोलिसांत गुन्हा दाखल...

याच प्रकरणावरून एका शिक्षकाच्या पत्नीनं आमदार बंब यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप बंब समर्थकांनी करत संबंधित शिक्षकपत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून आता या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार बंब म्हणाले की, मला कुणी कितीही धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही, जे कर्मचारी बोगसगिरी करून शासनाकडून घरभाडं उचलत आहे, त्यांची मी पोलखोल करणार असल्याचं सांगितलं.