मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC: मुंबईतील दोन बेकायदा नर्सिंग होमना टाळे; दहा गुन्हे दाखल

BMC: मुंबईतील दोन बेकायदा नर्सिंग होमना टाळे; दहा गुन्हे दाखल

Aug 05, 2022, 03:49 PM IST

    • BMC action against illegal Nursing Home: मुंबईतील कांदिवली परिसरातील दोन बेकायदा नर्सिंग होमना महापालिकेनं टाळं ठोकलं असून दहा नर्सिंग होमच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Nursing Home

BMC action against illegal Nursing Home: मुंबईतील कांदिवली परिसरातील दोन बेकायदा नर्सिंग होमना महापालिकेनं टाळं ठोकलं असून दहा नर्सिंग होमच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    • BMC action against illegal Nursing Home: मुंबईतील कांदिवली परिसरातील दोन बेकायदा नर्सिंग होमना महापालिकेनं टाळं ठोकलं असून दहा नर्सिंग होमच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेनं शहरातील बेकायदा नर्सिंग होम व रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला असून कांदिवली परिसरातील दोन नर्सिंग होमना टाळं ठोकलं आहे. तर, १० नर्सिंग होमच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व नर्सिंग होम कांदिवली परिसरातील आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Gadchiroli: गडचिरोलीतील धक्कादायक घटना, काळ्या जादूच्या संशयातून २ जणांना जिवंत जाळले; १५ जणांना अटक

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Sunday Mega Block 05 May 2024: मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; कुठून किती वाजता सुटणार लोकल? वाचा

Lok Sabha Elections 2024: काँग्रेसला धक्का! संजय निरुपम यांचा पत्नी आणि मुलीसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

कांदिवली परिसरात एकूण १३ नर्सिंग होम पैकी १२ विना परवाना सुरू असल्याचं आढळून आलं आहे. त्यापैकी दोन नर्सिंग होमना टाळं ठोकण्यात आलं आहे. तर, अन्य दहांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या हे नर्सिंग होम सुरू असून तिथं कर्मचारीही आहेत. कारवाईचा बडगा उगारण्यात आलेले हे नर्सिंग होम मागील दोन वर्षांपासून झोपडपट्टी परिसरात सुरू आहे. क्लिनिकच्या स्वरूपात ते चालवले जातात. त्यात ५ ते १० बेड असतात आणि १५ जणांचा स्टाफ असतो. गरीब रुग्ण हे त्यांचे मुख्य ग्राहक असतात, अशी माहिती आर दक्षिण प्रभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

१९४९ च्या बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार, नर्सिंग होम सुरू करायचा असल्यास महापालिकेकडं रीतसर नोंदणी करावी लागते. मात्र, अनेक नर्सिंग होम भाड्याच्या जागेत चालवले जातात. मात्र, संबंधित इमारतींचे मालक रुग्णालयासाठी आवश्यक त्या सुविधा देत नाहीत. त्यामुळं महापालिकेच्या नियमावलीचं आपोआपच उल्लंघन होतं. 'अनेकदा आम्हाला नर्सिंग होम सील करता येत नाहीत. त्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागते. तिथं संबंधितांना मोठा दंड ठोठावला जातो. पहिला गुन्हा असेल तर २० हजारांचा दंड बसतो. तक्रारी आल्यानंतर महापालिका कारवाई करते. मात्र, त्यानंतरही अनेक नर्सिंग होम सुरूच असतात. त्यामुळं नागरिकांनी स्वत: देखील सर्व माहिती घेऊनच उपचारासाठी जावं, असं आवाहन आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी केलं आहे.

‘सध्या कांदिवलीतील केवळ दोन रुग्णालयांना टाळं ठोकण्यात आलं आहे. आणखी पाच बंद करण्याचा आमचा विचार आहे. बेकायदा रुग्णालयात जाऊ नका असे फलक अशा रुग्णालयांच्या बाहेर लावले जातात. मात्र, हॉस्पिटल चालवणारे लोक हे फलक काढून टाकतात,’ अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

या रुग्णालयांना टाळं

महापालिकेनं संजय नगर येथील वाडीलाल गोसालिया रोडवरील मदिना हॉस्पिलटल बंद केलं आहे. त्याशिवाय, ठाकूर कॉम्प्लेक्स येथील जीवन हॉस्पिटललाही टाळं ठोकण्यात आलं आहे. सध्या हे हॉस्पिटल केवळ डे केअर सेंटर म्हणून सुरू असून इथं रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळं आकुर्ली रोड येथील संचेती हॉस्पिटलचा परवाना महापालिकेनं नुतनीकृत केलेला नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा