मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIA च्या कारवाईमुळं टळला मोठा घातपात! छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक

NIA च्या कारवाईमुळं टळला मोठा घातपात! छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 05, 2022 11:16 AM IST

NIA ने मोठी कारवाई करत दाऊद इब्राहीमचा सहकारी छोटा शकिलचा मेहुणा सलीम कुरेशी याला अटक केली आहे. सलीम कुरेशी याला सलीम फ्रूट या नावानेही ओळखल्या जात. NIA ने या वर्षी मुंबई आणि ठाण्यात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या जवळपास २० पेक्षा अधिक आरोपींवर कारवाई केली आहे.

दाऊद इब्राहीम
दाऊद इब्राहीम

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई करत दाऊद इब्राहीमचा डावा हात असलेल्या छोटा शकिलचा मेहुणा सलीम कुरेशी याला अटक केली आहे. आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. कुरेशील सलीम फ्रूट यानावानेही ओळखले जाते. NIAने या वर्षी मुंबई आणि ठाण्यात मोठी कारवाई करत दाऊद इब्राहीमशी संबंधित असलेल्या तब्बल २० जणांवर कारवाई केली आहे. 

दाऊद इब्राहीमने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सेशल युनिट बनवले असून या माध्यमतून तो दहशतवादी हल्ले करणार होता, अशी खळबळ जनक माहिती NIAच्या तपासात पुढे आली आहे. हे स्पेशल यूनिट पाकिस्तानमधून आपली सूत्र हलवत होती. या मार्फत भारतातील प्रमुख नेत्यांवर हल्ले करण्याचा कट देखील रचण्यात आला होता. पाकिस्तानात राहून भारतात दंगली भडवकण्याचा देखील कट रचण्यात आला होता.

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकरणात सलीम कुरेशीचे नाव पुढे आले होते. सलीम कुरेशीवर तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी पैशांची जमवाजमव करणे, तसेच लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्यात सलीम हा आघाडीवर होता.

यावर्षी जानेवारी महिन्यात एनआई ने गोरेगांव येथील आरिफ अबुबकर शेख उर्फ भाईजान त्याचा भाऊ शब्बीर अबुबकर शेख यांच्यावर डी-कंपनी सहभागी होण्याचा तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती.

एनआईएने ९ मे रोजी मुंबईत तब्बल २४ ठिकाणी तर मीरा रोड येथे पाच ठिकाणी छापेमारी केली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित असेलल्या अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोख रक्कम आणि हत्यारे जप्त करण्यात अलायी होती.

IPL_Entry_Point

विभाग