मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Accident : भरधाव रिक्षा ब्रेक फेल झाल्याने २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

Bhiwandi Accident : भरधाव रिक्षा ब्रेक फेल झाल्याने २० फूट खोल खड्ड्यात कोसळली, चिमुरड्यासह तिघांचा मृत्यू

Jun 01, 2023, 10:38 PM IST

  • Bhiwandi rikshaw accident : ब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या  २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Bhiwandi Accident

Bhiwandi rikshaw accident : ब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या २०फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Bhiwandi rikshaw accident : ब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या  २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

भिंवडी – भिवंडीत रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. ब्रेक फेल झालेली रिक्षा पाण्याने भरलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भिवंडीत घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पिंपळघर भागात असलेल्या भूमी वर्ल्ड समोर हा अपघात झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी हि बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पावसाचा खेळ! मुंबई, रायगड, ठाणे, सांगली, सोलापूरला उष्णतेची लाट तर विदर्भात पाऊस

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

मुन्नी देवी चव्हाण (वय ३२), राधा चव्हाण (वय ३३) आणि मुलगी अंशिका चव्हाण (वय २) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. यांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा चालक राकेश चव्हाण (वय ३४), रवी चव्हाण (वय ११), अंजली चव्हाण (वय ९), अंकिता चव्हाण (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील हे सगळे जण टिटवाळा जवळच्या बनेली गावात राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार राकेश चव्हाणयांची मेहुणी उत्तर प्रदेशहून बहिणीच्या घरी राहायला आली होती. मेहुणीला मुंबई फिरवण्यासाठी राकेश चव्हाण कुटुंबासह जुहू चौपाटीवर गेला. रिक्षामध्ये राकेश त्याची मृत पत्नी आणि चार मुलं होती. मुंबईहून घरी टिटवाळ्याला जात असताना मुंबई-नाशिक हायवेवर भूमी वर्ल्ड जवळ रिक्षांचा ब्रेक फेल झाला आणि रिक्षा खांबाला जाऊन आदळली, यानंतर बाजूलाच असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात पडली. खड्ड्यात पाणी असल्याने रिक्षात्यातबुडाली.

रिक्षा पाण्यात बुडल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला,पण तब्बल एका तासानंतर त्यांना मदत मिळाली. परिसरातील लोकांनी दोरी टाकून चव्हाण कुटुंबाला बाहेर काढलं.

 

सर्वांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथील डॉक्टरांनी राकेशची पत्नी मुन्नीदेवी, मेहुणी राधा आणि छोटी मुलगी अंशिका यांना मृत घोषित केलं. राकेशसह त्याचा मुलगा रवी, मुलगी अंकिता आणि अंजली यांच्यावर उपचार सुरू आहेत. चव्हाण कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उतलेले तीन जणही जखमी झाले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा