मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashish Shelar : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपात मोठे फेरबदल, आशिष शेलार होणार प्रदेशाध्यक्ष?

Ashish Shelar : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपात मोठे फेरबदल, आशिष शेलार होणार प्रदेशाध्यक्ष?

Aug 08, 2022, 07:39 PM IST

    • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असल्याने आशिष शेलार (Ashish shelar) यांची त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आशिष शेलार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असल्याने आशिष शेलार (Ashish shelar) यांची त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असल्याने आशिष शेलार (Ashish shelar) यांची त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई – बहुप्रतिक्षित शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) मंगळवारी होणार आहे. उद्या शिंदे गट व भाजपकडून १२ ते १५ मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असल्याने आशिष शेलार (Ashish shelar) यांची त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Beed News : बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त, नगरसेवकच निघाला 'पुष्पा'

MHADA News : मुंबईतील ‘या’ उपनगरात घर मिळवणे झाले सोपे; म्हाडाने बदलला नियम, आता लागणार फक्त दोन कागदपत्रे

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. आज रात्री किंवा ९ ऑगस्टपर्यंत खातेवाटप तसेच मंत्र्यांची यादी अंतिम केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे. एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे हे बदल केले जातील अशी चर्चा आहे.

लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. मुंबई महापालिका आणि  २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मोठी  जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते. त्यामुळे  मुंबई महापालिका निवडणूक लागण्याआधी शेलार यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यानही शेलार प्रदेशाध्यक्ष असतील, असे म्हटले जात आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा