मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Borivali Mumbai : पलंगावर झोपण्यावरून मध्यरात्री राडा; संतप्त पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

Borivali Mumbai : पलंगावर झोपण्यावरून मध्यरात्री राडा; संतप्त पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

Jan 30, 2023, 10:50 PM IST

    • Borivali Crime News : पलंगावर झोपण्यावरून झालेल्या वादामुळं पतीनं आपल्याच पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Borivali Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Borivali Crime News : पलंगावर झोपण्यावरून झालेल्या वादामुळं पतीनं आपल्याच पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Borivali Crime News : पलंगावर झोपण्यावरून झालेल्या वादामुळं पतीनं आपल्याच पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Borivali Mumbai Crime News Marathi : मध्यरात्री घरातील पलंगावर झोपण्यावरून झालेल्या वादानंतर पतीनं आपल्याच पत्नीला बेदम माराहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील बोरिवलीत ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पतीनं केलेल्या मारहाणीत पत्नीच्या चेहऱ्यावर आणि कानाला गंभीर मार लागला असून त्यानंतर आता महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बोरिवलीच्या उच्चभ्रू परिसरात घरघुती हिंसाचाराची घटना समोर आल्यामुळं मुंबईत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : राज्यात दोन ठिकाणी मतदान केंद्राबाहेरील रांगेतच दोघांनी सोडला जीव, नेमकं काय झालं?

Kolhapur News : धुणं धुण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला! हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू, आजरा तालुक्यातील घटना

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Maharashtra Weather Update:विदर्भ तापला! बहुतांश जिल्ह्यात पारा ४३ पार; अकोला, वर्धा, नागपूरला हीट वेव्ह व पावसाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या बोरिवली परिसरात घरातील पलंगावर झोपण्यावरून दाम्पत्यात जोरदार राडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्याचं एकमेकांशी जमत नसल्यामुळं त्यांनी आळीपाळीनं पलंगावर झोपण्याचा निर्णय घेतला होता. पलंगावर झोपण्याचा दिवस असल्यामुळं महिला पलंगावर झोपलेली होती. त्यावेळी जमीनीवर झोपलेला तिचा पती मध्यरात्री उठला आणि त्यानं पत्नीला पलंग सोडून खाली झोपण्याची मागणी केली. परंतु महिलेनं आज झोपण्याची पाळी माझी असल्याचं सांगत पतीला झोपण्यास पलंग देण्यास नकार दिला.

त्यामुळं दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. शिवीगाळ झाल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. झोपण्यास पलंग न दिल्यानं संतापलेल्या आरोपीनं आपल्याच पत्नीच्या कानशिलात लगावत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. पतीनं केलेल्या मारहाणीत चेहऱ्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाल्यानंतर पीडित महिलेनं आरोपी पतीविरोधात बोरिवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिलेच्या पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा