मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagirath Biyani : भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; नातेवाईकांनी केला मोठा खुलासा

Bhagirath Biyani : भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; नातेवाईकांनी केला मोठा खुलासा

Oct 13, 2022, 08:17 AM IST

    • Bhagirath Biyani Suicide Case : भाजचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
Bhagirath Biyani Suicide Case Beed (HT)

Bhagirath Biyani Suicide Case : भाजचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

    • Bhagirath Biyani Suicide Case : भाजचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

Bhagirath Biyani Suicide Case Beed : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी तीन दिवसांपूर्वी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळं राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. बियाणी यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले होते. परंतु आता बियाणी यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात नवा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

बियाणी कुटुंबियांनी पोलिसांना दिली माहिती...

भगीरथ बियाणी हे त्यांची पिस्तूल साफ करत असताना चुकून ट्रिगरचं बटण दाबलं गेल्यानं त्यांना गोळी लागल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस तपासात केला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात बियाणी यांचा मोबाईल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवलेला आहे.

भाजप नेते भगीरथ बियाणी यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर शहरातील पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. बियाणी हे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचे कट्टर समर्थक होते.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी घेतली बियाणी कुटुंबियांची भेट...

भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्तीय आणि भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी बीडमध्ये जाऊन बियाणी कुटुंबियांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आमदार भारतीय यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत प्रकरणाच्या चौकशीची माहिती घेतली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा