मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “अपक्षांना सोबत घेण्यासाठी अब्दुल सत्तारांनी मदत केली”; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

“अपक्षांना सोबत घेण्यासाठी अब्दुल सत्तारांनी मदत केली”; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

Jun 11, 2022, 06:21 PM IST

    • शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केला आहे.
संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केला आहे.

    • शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केला आहे.

औरंगाबाद –राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे पडणारा सातवा उमेदवार कोण याची उत्सुकता होती. या निवडणुकीत संख्याबळ नसताना भाजपने आपला तिसरा उमेदवार निवडून आणला व शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केले. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक सहाव्या जागेवर विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Rape: लैंगिक संबंध ठेवल्यास नोकरी मिळेल; काळ्या जादूच्या नावाखाली बरोजगार महिलेवर बलात्कार, भोंदू बाबाला अटक

Mumbai Women Suicide: मुंबईत प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

निकालानंतर भाजपने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांनी महाआघाडीला मते न दिल्याचा आरोप केला. त्यानंतर अपक्षांनीही संजय राऊतांवर टीका करत संजय पवार यांना पडलेले ३३ मते काय अमेरिकेतून आली का, असा सवाल केला.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी केला आहे. संतोष दानवे हे जालन्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते. अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी, असे संतोष दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

संतोष दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत ते कधीच त्या पक्षात नसतात. अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सत्तार हे निश्चितपणे ज्या पक्षात असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे.

अब्दुल सत्तार यांनी १०० टक्के आम्हाला मदत केली आहे. त्यांचे तोंडच असे आहे की ते बाजारात कोण कुठे गेले आणि कोण कुठे चालले आहे हे बघत फिरत असतात. अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळत असते. हीच मदत आम्हाला विधान परिषदेसाठी अपेक्षित आहे आणि तंतोतंत ते याचे पालन करतील,”असेही संतोष दानवे म्हणाले.