मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Updates: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा

May 10, 2024, 06:57 AM IST

    • Maharashtra temperature: महाराष्ट्रात कोणत्या भागांत पावसाच्या सरी कोसळणार आणि कुठल्या ठिकाणी उकाडा कायम आहे? हे जाणून घेऊयात.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता आहे. (HT)

Maharashtra temperature: महाराष्ट्रात कोणत्या भागांत पावसाच्या सरी कोसळणार आणि कुठल्या ठिकाणी उकाडा कायम आहे? हे जाणून घेऊयात.

    • Maharashtra temperature: महाराष्ट्रात कोणत्या भागांत पावसाच्या सरी कोसळणार आणि कुठल्या ठिकाणी उकाडा कायम आहे? हे जाणून घेऊयात.

Maharashtra Weather News: महाराष्ट्राच्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक भागांत उन्हाचे चटके जाणवत असताना विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमानात घट झाली. वाशीम, गोंदिया येथे वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. वाशीम आणि मालेगावमध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलिकडे पोहोचले. तर, अकोला आणि विदर्भात ४२ अंश सेल्सिअस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

Weather Update : अमरावतीत ऑरेंज अलर्ट; राज्यात काही भागात गारपिटीचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.

Mumbai airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या आज ६ तास बंद राहणार, जाणून घ्या कारण

राज्यात गुरुवारी नोंदवण्यात आलेले तापमान

राज्यात गुरुवारी (०९ मे २०२४) वाशीम आणि मालेगाव येथे सर्वाधिक ४२.६ तापमान नोंदवले. याशिवाय, पुणे (३९.४ अंश सेल्सिअस), धुळे (४१ अंश सेल्सिअस), जळगाव (४२.४ अंश सेल्सिअस), कोल्हापूर (३७.१ अंश सेल्सिअस), महाबळेश्वर (३२.६ अंश सेल्सिअस), नाशिक (३९.२ अंश सेल्सिअस), निफाड (३८.९ अंश सेल्सिअस), सांगली (३८ अंश सेल्सिअस), सातारा (३९.२ अंश सेल्सिअस), सोलापूर (४१.६ अंश सेल्सिअस), सांताक्रूझ (३३.६ अंश सेल्सिअस), डहाणू (३४.९ अंश सेल्सिअस), रत्नागिरी (३४ अंश सेल्सिअस), छत्रपती संभाजीनगर (४०.२ अंश सेल्सिअस), बीड (४०.७ अंश सेल्सिअस), नांदेड (४०.६ अंश सेल्सिअस), परभणी (४१.३ अंश सेल्सिअस), अकोला (४२.५ अंश सेल्सिअस), अमरावती (४०.६ अंश सेल्सिअस), बुलढाणा (४०.४ अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (४०.१ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (३९ अंश सेल्सिअस), गडचिरोली (३९.४ अंश सेल्सिअस), गोंदिया (३६ अंश सेल्सिअस), नागपूर (३९.३ अंश सेल्सिअस), वर्धा (४१ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या