Mumbai airport runways News: मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या आज (९ मे २०२४) सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही धावपट्ट्या सकाळी ११.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंद राहतील, असे विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ असते.
“मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) पावसाळी आपत्कालीन योजनेचा एक भाग म्हणून प्राथमिक धावपट्टी ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ ९ मे २०२४ रोजी तात्पुरती कार्यान्वित राहणार नाही”, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
एअरलाइन्स आणि इतर भागधारकांना उड्डाणांचे वेळापत्रक आगाऊ ठरवण्याची सूचना करण्यासाठी डिसेंबरमध्ये नोटीस टू एअरमेन जारी करण्यात आली होती . धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे कोणत्याही विमान वाहतुकीवर परिणाम होणार नाही किंवा प्रवाशांची गैरसोय होणार नाही. प्राथमिक धावपट्टी, ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ या दोन क्रॉस रनवे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहतील. या विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ असते.
सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी याआधीही पावसाळी आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून मुंबई विमानतळाची धावपट्टी एक दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता विमानतळाच्या १४/३२ आणि ०९/२७ या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील." धावपट्टी बंद करणे ही वार्षिक प्रथा आहे आणि ऑपरेशनल सातत्य राखण्यास मदत करण्यासाठी आपत्कालीन योजनेचे उद्दीष्ट आहे.
मुंबई विमानतळ जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून एका तासाला सुमारे ४६ विमानांचे लँडींग आणि उड्डाण होते. तर, दुय्यम धावपट्टीवरून तासाला अंदाजे ३५ विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होते.
संबंधित बातम्या