Maharashtra Weather Update : पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात उच्च तापमान, अवकाळी पाऊस, आर्द्रता, जोरदार वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीच्या आयसोल भागात गारपीट (ऑरेंज अलर्ट) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, वर्धा व पुण्यात येत्या पाच दिवसात सायकांळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट व वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात येत्या चार दिवसात उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच उष्माही वाढणार असल्याची शक्यता आहे. विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची छाया पसरताच उन्हाचा चटका कमी अधिक होऊ लागला आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात आज अमरातवी व नागपूरसह कोकणात पावसाच्या सरी कोसळल्यान लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात गुरुवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.
ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपिटी शक्यता आहे. ताशी ४० ते ५० kmph वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.आज९मे रोजी पुणे, नाशिक,सोलापूर,सांगली, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर. पुणे, सांगली, सोलापूर व औरंगाबाद जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे गारपिटी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जालना, परभणी, बीड जिल्ह्यातकाही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी१० मे रोजी वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नाही.
१० मे रोजी पुणे,सोलापूर,सांगली सातारा,नांदेड,लातूर,हिंगोली,धाराशीव आदि जिल्ह्यात यलो अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.