मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 09, 2024 04:00 PM IST

Mahanand Dairy : महाराष्ट्रातील प्रसिद्ध दूध सहकारी संस्था महानंद गुजरातच्या मदर डेअरीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असून याची बातमी आज बाहेर आली आहे.

‘महानंद’वर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा
‘महानंद’वर अखेर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

Mahanand Dairy Handovered NDDB : महाराष्ट्रातील महानंद डेअरी (mahanand dairy) अखेर इतिहासजमा झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद या राज्यातील प्रसिद्ध डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीने (mother dairy) कब्जा मिळवला आहे. यामुळे राजकारणात पुन्हा एका महाराष्ट्र गुजरात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही महिन्यांपासून महानंद डेअरी गुजरातच्या अमूल डेअरीकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत होता. मात्र आता ही डेअरी अमूलकडे न जाता तीमदर डेअरी या दुध व्यवसायातील मोठ्या ब्रँडकडे गेली आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २ मे रोजीच पूर्ण झाली असून याचे वृत्त आज बाहेर आले आहे. त्याचबरोबर महानंदला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदर डेअरीला तब्बल २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे.

'महानंद' नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला (national dairy development board) चालवण्यासाठी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने काही महिन्यापूर्वी घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर राजकारण चागलंच तापलं होतं. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना आता दूध व्यवसायही राज्याबाहेर घालवला जात आहे. गुजरातसमोर राज्य सरकार नमतं घेत असल्याचा आरोप किसान महासभेने केला होता. विरोधकांनी देखील हा मुद्दा लावून धरत सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

गेल्या काही महिन्यांपासून या संस्थेचा हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता. या हस्तांतरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्दावरून एकमेकांवर आरोप केले होते.अनेक आरोप व प्रत्यारोपानंतर मदर डेअरीने महानंद डेअरीवर ताबा मिळवला. महानंद डेअरीवर आता गुजरातच्या मदर डेअरीची मालकी आली आहे. याची हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

गुजरातमधील मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून (एनडीडीबी) चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर संचालक मंडळाने महानंद एनडीडीबीकडे देण्याचा निर्णय घेतला.

 

महानंद डेअरी सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था आहे. महानंदच्या आर्थिक स्थितीबाबत राज्य सरकारकडून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळवले होते. त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि राज्य सरकारमध्ये पाच वर्षाचा करार झाला. महानंदा डेअरी आजा पाच वर्षा मदर डेअरीच्या ताब्यात राहणार आहे. आता ही डेअरी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या ताब्यात गेली आहे.

IPL_Entry_Point