मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राज्यसभा निवडणूक २०२२: BJP ला ४ जागांचे नुकसान, शंभरीसाठी करावी लागणार प्रतीक्षा

राज्यसभा निवडणूक २०२२: BJP ला ४ जागांचे नुकसान, शंभरीसाठी करावी लागणार प्रतीक्षा

Jun 11, 2022, 04:00 PM IST

    • गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये एक-एक सीटांवर विजय मिळवल्यानंतर भाडप आपल्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात १०० च्या आकड्याजवळ पोहोचली होती.
राज्यसभानिवडणूक २०२२

गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्याराज्यसभा निवडणुकीत आसाम,त्रिपुरा आणि नागालँडमध्येएक-एकसीटांवर विजय मिळवल्यानंतर भाडप आपल्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात १०० च्या आकड्याजवळ पोहोचली होती.

    • गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये एक-एक सीटांवर विजय मिळवल्यानंतर भाडप आपल्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहात १०० च्या आकड्याजवळ पोहोचली होती.

यावर्षी एप्रिल महिन्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात १०० च्या आकड्यापर्यंत पोहचलेले भाजपचे संख्याबळ राज्यसभेच्या ५७ जागांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या (Rajya sabha elections result ) निवडणुकीनंतर ९५ वरून कमी होऊन ९१ झाले आहे. राज्यसभेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार निवृत्त होत असलेल्या ५७ सदस्यांसह वरिष्ठ सभागृहाचे संख्याबळ २३२ आहे, त्यापैकी भाजपचा आकडा ९५ इतका आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Ebrahim raisi : इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू! १७ तासानंतर सापडले हेलिकॉप्टर

निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये (Rajya sabha elections 2022) भाजपचे २६ सदस्य सामील आहेत. मात्र या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे २२ उमेदवार निवडणूक आले आहेत. अशा पद्धतीने भाजपला चार जागांचे नुकसान झाले आहे. नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर भाजपची सदस्यसंख्या ९५ वरून कमी होऊन ९१ होईल. म्हणजेच १०० चा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून प्रतीक्षा करावी लागणार. अजूनही राज्यसभेत ७ नामांकित सदस्यांसह १३ जागा रिक्त आहेत.

नामांकित सदस्यांच्या जागा भरल्यानंतर भाजप १०० आकड्याच्या जवळपास पोहोचू शकतो. मागील एप्रिल महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यात भाजपने प्रत्येकी १-१ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच भाजप १०० आकड्यांपर्यंत पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपची ही मोठी कामगिरी असल्याचे म्हटले होते.

राज्यसभेच्या ५७ सीटांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उत्तरप्रदेश, तामिलनाडु, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगाना, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये सर्व ४१ उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले होते.  यामध्ये भाजपचे १४ उमेदवार सामील आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला तीन जागांचा फायदा झाला आहेत. तेथे पक्षाचे पाच सदस्य निवृत्त झाले होते तर नवीन आठ सदस्य निवडून आले आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपला दोन-दोन जागा आणि उत्तराखंड व झारखंडमध्ये १-१ जागा मिळाली. हरियाणा, राजस्थान,महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये १६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला महाराष्ट्र आणि कर्नाटकात ३-३ तर हरियाणा आणि राजस्थानमध्ये एक-एक सीट मिळाली.

भाजपच्या निवडणूक रणनितीने विजयीची शक्यता कमी असतानाही पक्षाने दोन उमेदवार व एक पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार कर्नाटक,महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विजयी झालाचार राज्यात भाजपला ८ जागा मिळाल्या. अशाप्रकारे एकूण ५७ जागांपैकी २२ जागांवर भाजप उमेदवार निवडणूक आले.

पुढील बातम्या