मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यसभेच्या निकालावर बोलताना अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यसभेच्या निकालावर बोलताना अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Jun 11, 2022, 04:33 PM IST

    • Reaction on Rajya Sabha Polls Results: राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोचरा टोला हाणला आहे.
Uddhav Thackeray - Amruta Fadnavis

Reaction on Rajya Sabha Polls Results: राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोचरा टोला हाणला आहे.

    • Reaction on Rajya Sabha Polls Results: राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोचरा टोला हाणला आहे.

Amruta Fadnavis on Rajya Sabha Election Results: राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून सध्या टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबच त्यांचे समर्थकही एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय विषयांवर सातत्यानं मतं मांडणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही राज्यसभेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Couple Suicide: मुंबईच्या कांदिवलीत नैराशातून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Pune Porsche car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा थरकाप उडवणारा video व्हायरल, पाहा!

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

एका कार्यक्रमात त्यांना राज्यसभेतील भाजपच्या विजयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सर्वप्रथम पीयूष गोयल, अनिल बोंडे व धनंजय महाडिक या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘हा विजय खूपच सुंदर आहे आणि सत्याचा आहे. सत्याच्या बाजूनं लोक उभे राहिले याचा आनंद आहे,’ असं त्या म्हणाल्या. 

अमृता यांनी यावेळी आपले पती देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. ‘देवेंद्र आता एकटे नाहीत, संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्यासोबत आहे. आम्ही आहोत, तुम्हीही आहात. देवेंद्रजींच्या कर्तृत्वाचं, तत्त्वाचं आणि नेतृत्वाचं हे यश आहे. ते काय करू शकतात हे त्यांनी आधीही दाखवलं आहे. त्यामुळं यापुढंही केवळ विकासाचं राजकारण चालेल, टोमणेबाजीचं चालणार नाही, असा टोला अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजूनं लोक प्रेमानं उभे राहिले आहेत. राज्यातील सरकार कसं चाललंय हे ते पाहत आहेत. त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करावाच लागला नाही,' असं त्या म्हणाल्या. 'राज्यसभा जिंकली आहेच आणि विधान परिषदेचा निकालाही जवळपास आता लागल्यात जमा आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेसाठी हा धडा आहे का, असं विचारलं असता, धडे आता सुरू होतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

पुढील बातम्या