मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hadapsar Murder: दारू पिताना पडली वादाची ठिणगी; मित्राचा दगडाने ठेचून खून

Hadapsar Murder: दारू पिताना पडली वादाची ठिणगी; मित्राचा दगडाने ठेचून खून

Aug 08, 2022, 06:00 PM IST

    • Youth killed friend in Hadapsar: पुण्यात हडपसर येथे दारू पिण्याचा किरकोळ वादातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
pune crime

Youth killed friend in Hadapsar: पुण्यात हडपसर येथे दारू पिण्याचा किरकोळ वादातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    • Youth killed friend in Hadapsar: पुण्यात हडपसर येथे दारू पिण्याचा किरकोळ वादातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Youth killed friend in Hadapsar: पुण्यात गुन्हेगारी वृत्ती हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. किरकोळ करणावरून एकमेकांचा जीव घेतला जात आहे. अशीच एक घटना हडपसर येथे उघडकीस आली आहे. दारू पिण्याच्या किरकोळ वादातून आपल्या मित्राचाच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आला आहे. याबाबत अनिलचा भाऊ अक्षय राजू सासी (वय २५) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल चर्मकार आहे. आरोपी प्रवीण मजुरी करतो. दोघे चांगले मित्र असून दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील वैदुवाडीतील कालव्याजवळ हे दोघेजण दारू पित होते. त्या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद ‌झाला. रागाच्या भरात प्रवीणने अनिलच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत अनिल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रविवारी (दि. ७ ) रात्री मृत्यू झाला.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. पसार झालेल्या प्रवीणला पोलिसांनी अटक केली. सहायक निरीक्षक संतोष डांगे तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा