मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgoan Crime : जळगावात पोलिसांची मोठी कारवाई; ३० जिवंत काडतुसे, ६ देशी कट्टे अन् ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalgoan Crime : जळगावात पोलिसांची मोठी कारवाई; ३० जिवंत काडतुसे, ६ देशी कट्टे अन् ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Aug 19, 2022, 04:50 PM IST

    • Jalgoan police arrested 4 criminal जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३० जीवंत काडतुसे, ६ देशी कट्टे आणि ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Jalgaon crime

Jalgoan police arrested 4 criminal जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३० जीवंत काडतुसे, ६ देशी कट्टे आणि ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    • Jalgoan police arrested 4 criminal जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३० जीवंत काडतुसे, ६ देशी कट्टे आणि ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव : जळगाव येथील चोपडा गावात काही चोरटे हे देशी कट्ट्याची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत ३० जिवंत काडतुसांसह ६ देशी कट्टे आणि ३८ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी ६ जणांवर आर्म्स अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

300 year old tree: ‘मेट्रो’ मार्गात अडसर ठरलं म्हणून मुंबईत ३०० वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची कत्तल; रहिवाशांचा संताप

नालासोपारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २ वेळा प्रसुती; पहिल्या बाळाची विक्री, १६ जणांविरोधात गुन्हे

या प्रकरणी पोलिसांनी गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (वय २५ रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा), मोहसीन हनिफ मुजावर (वय ३० रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय २३ रा. शिवाजी चौक, मलकापुर ता. कराड. जि. सातारा) आणि अक्षय दिलीप पाटील (वय २८ रा.४५ रविवार पेठ, कराड जि.सातारा) अशी अठक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारासा चोपडा-शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी जात चौघांना रंगे हात पकडले. त्यांच्याकडून सहा गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन आणि मोटार असा ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात संगनमताने गुन्हा करत असल्याने त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस फरार दोघांचा शोध घेत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा