मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: उपवासात होऊ शकतो ॲसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास, फॉलो करा या टिप्स

Health Tips: उपवासात होऊ शकतो ॲसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास, फॉलो करा या टिप्स

Mar 23, 2023, 06:28 PM IST

  • Chaitra Navratri: उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या सामान्य आहे. चैत्र नवरात्रीच्या उपवासात ही समस्या होत असेल तर तुम्ही तज्ञांनी सुचवलेल्या काही पद्धतींचा अवलंब करू शकता.

उपवासात ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी टिप्स (unsplash)

Chaitra Navratri: उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या सामान्य आहे. चैत्र नवरात्रीच्या उपवासात ही समस्या होत असेल तर तुम्ही तज्ञांनी सुचवलेल्या काही पद्धतींचा अवलंब करू शकता.

  • Chaitra Navratri: उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या सामान्य आहे. चैत्र नवरात्रीच्या उपवासात ही समस्या होत असेल तर तुम्ही तज्ञांनी सुचवलेल्या काही पद्धतींचा अवलंब करू शकता.

Tips to Avoid Acidity and Constipation: चैत्र नवरात्रीमध्ये देवीच्या ९ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या दरम्यान देवीचे भक्त नऊ दिवस उपवास ठेवतात आणि वेगळा आहार पाळतात, ज्यामध्ये धान्यापासून अंतर ठेवले जाते आणि फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. या उपवासात शरीर आणि मनाला अनेक फायदे होतात. हे लिव्हर डिटॉक्स करते आणि शरीरात साठलेली चरबी कमी करू शकते. मात्र, नवरात्रीच्या उपवासात खाण्याच्या सवयी बदलू शकतात. या दरम्यान तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेला हानी पोहोचते. तसेच, काही लोक जास्त फायबर खात असतील आणि पुरेसे पाणी पीत नसतील तर त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. त्याचबरोबर काही लोकांना ॲसिडिटीचा त्रासही होतो. येथे तज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

World Asthma Day 2024: दम्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Aam Pora Recipe: चवीला अप्रतिम लागते बंगाल स्टाईल आम पोरा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

लिंबूवर्गीय फळे टाळा

संत्री, मोसंबी, द्राक्ष आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अॅसिडिटी होऊ शकते. या फळांऐवजी उपवास करणाऱ्या व्यक्तीने केळी, चिकू, टरबूज किंवा खरबूज ही फळे खावीत. ही फळे पोटासाठी आरामदायी असतात.

हायड्रेटेड रहा

उपवास दरम्यान हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. तुम्ही उपवास करत असता तेव्हा थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाणी मदत करू शकते. तसेच, एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी थोडेसे पाणी पिण्याचा किंवा थोडे थोडे दोन दोन घोट पिण्याचा सल्ला दिला जातो. एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने ब्लोटिंग आणि अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

हेल्दी ड्रिंक्स प्या

उपवासात ताक आणि थंड दूध यासारख्या पेयांचा आहारात समावेश करा. कारण ते पोट शांत आणि थंड ठेवू शकतात. उपवास करताना नारळ पाणी प्यायल्याने पीएच पातळी संतुलित राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

हाय फायबरयुक्त पदार्थ खा

जास्त प्रमाणात फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. कारण ते आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देतात. अशा परिस्थितीत राजगिऱ्याचे पीठ, कुट्टूचे पीठ, भगर, मखाना या सारख्या खाद्यपदार्थां मध्ये भरपूर फायबर मिळते.

व्यायाम

उपवास दरम्यान व्यायाम केल्याने तुम्हाला उत्साही राहण्यास मदत होते. असे केल्याने, पोटातील रक्त प्रवाह वाढू शकतो आणि तुमची आतड्यांची हालचाल सुरळीत राहू शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग