मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Tips: महाराष्ट्रातलं हे ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही! नक्की द्या भेट

Travel Tips: महाराष्ट्रातलं हे ठिकाण स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही! नक्की द्या भेट

May 22, 2023, 01:28 PM IST

    • Summer Travel: महाराष्ट्रातील या हिल स्टेशनवरून तुम्हाला आजूबाजूचे चे दृश्य दिसते ते सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही.
ट्रॅव्हल टिप्स (Freepik )

Summer Travel: महाराष्ट्रातील या हिल स्टेशनवरून तुम्हाला आजूबाजूचे चे दृश्य दिसते ते सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही.

    • Summer Travel: महाराष्ट्रातील या हिल स्टेशनवरून तुम्हाला आजूबाजूचे चे दृश्य दिसते ते सौंदर्य स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही.

Mahabaleshwar Travel: महाराष्ट्र देखील उन्हाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण असू शकते. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णता जाणवू शकते. पण या व्यतिरिक्तही अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला काश्मीरला भेट देण्याचा अनुभव येईल.आम्ही महाबळेश्वरबद्दल बोलत आहोत. महाराष्ट्रातील ऑफबीट पर्यटन स्थळांमध्येही त्याची गणना होते. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले महाबळेश्वर सौंदर्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही. तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. चला जाणून घेऊयात या ठिकाणाबद्दल...

ट्रेंडिंग न्यूज

Mango Eating Tips: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे

World Red Cross Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रेडक्रॉस दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Turmeric Tea Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या हळदीचा चहा! वजन कमी होण्यासोबतच दूर राहतील ‘हे’ आजार

Joke of the day : भाजी चांगली झाली नाही असं मुलानं म्हणताच ती जेव्हा नवऱ्याला विचारते…

सुंदर धबधबे

महाबळेश्वरमध्ये अनेक धबधबे पाहायला मिळतील. डोंगरावरून खाली कोसळणारे धबधबे बघायला खूप सुंदर वाटतात. येथे लिंगमाला धबधबा, धोबी धबधबा आणि चायनामन धबधबा असे अनेक लोकप्रिय धबधबे आहेत.

स्ट्रॉबेरी महोत्सव

महाबळेश्वरमध्ये दरवर्षी स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. स्ट्रॉबेरीपासून बनवलेल्या पेय आणि मिष्टान्नांचे प्रदर्शनही या महोत्सवात आयोजित करण्यात आले आहे.

Hill Stations Near Nasik: नाशिकच्या आजूबाजूला फिरण्यासाठी ही ५ सुंदर हिल स्टेशन्स!

महाबळेश्वरमधील मंदिर

महाबळेश्वर शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. भगवान शिवाला समर्पित महाबळेश्वर मंदिर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे पंचगंगा मंदिर देखील आहे, जे पाच नद्यांच्या उगमाचे प्रतीक आहे. ही मंदिरे इथल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक देतात.

Camping Places in India: कॅम्पिंगला जाण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणांना भेट द्या!

अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी

साहसप्रेमींसाठी महाबळेश्वर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या हिरव्यागार पायवाटेवर ट्रेकिंगपासून ते धुक्याच्या जंगलात घोडेस्वारी करण्यापर्यंत, साहस शोधणाऱ्यांसाठी येथे अनेक मार्ग आहेत. येथे तुम्ही रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग आणि प्राचीन जंगलात कॅम्पिंग देखील करू शकता.

Best Books For Journey: ही ५ पुस्तके रेल्वे प्रवास रोमांचक बनवतील! नक्कीच सोबत घेऊन जा

कधी जावे?

मार्च ते जून हा महाबळेश्वरला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. या काळात इथे जास्त पाऊस पडत नाही आणि तुम्ही सहज फिरू शकता.