मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Camping Places in India: कॅम्पिंगला जाण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणांना भेट द्या!

Camping Places in India: कॅम्पिंगला जाण्याचा प्लॅन करताय? या ठिकाणांना भेट द्या!

May 21, 2023 04:53 PM IST

Traveling Tips: कॅम्पिंगची आवड असेल तर बजेटमध्ये कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी काही खास आणि उत्तम ठिकाणांचा पर्याय जाणून घ्या.

Camping Tips
Camping Tips (pexels)

Camping Places in India: भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत, परंतु या पर्यटन स्थळांमध्ये कॅम्पिंग किंवा ट्रेकिंगचे ठिकाण अनेक लोक शोधत असतात. हॉटेलच्या खोलीत बंद राहण्याऐवजी, लोकांना सुंदर दृश्यांमध्ये कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा आहे. भारतात कॅम्पिंगची अनेक ठिकाणे आहेत. कॅम्पिंगची आवड असेल तर बजेटमध्ये कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी काही खास आणि उत्तम ठिकाणांचा पर्याय जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

भीमताल

उत्तराखंडमध्ये कॅम्पिंगसाठी अनेक ठिकाणे आहेत. यापैकी एक म्हणजे भीमताल, जो हिमालयात तळ ठोकण्यासाठी उत्तम पर्याय आहे. डोंगर आणि जंगलांनी वेढलेल्या भीमतालमध्ये कॅम्पिंग करताना चंद्र आणि तारे अगदी जवळून पाहता येतात. कॅम्पिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच येथे फिरण्यासाठी अनेक पर्याय मिळतील. पुरातन शिवमंदिर 'भीमेश्वर महादेव मंदिर' आणि भीमताल तलावात नौकाविहाराचा आनंद लुटता येतो.

Hill Stations Near Nasik: नाशिकच्या आजूबाजूला फिरण्यासाठी ही ५ सुंदर हिल स्टेशन्स!

धर्मशाळा

धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे कॅम्पिंगचा अनुभव खूप मजेदार होईल. कांगडा जिल्ह्यातील टेकड्यांमध्ये वसलेले हे हिल स्टेशन त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. धर्मशालामध्ये अनेक ट्रेकिंग मार्ग आहेत जिथून हिमालयात प्रवेश करता येतो. सर्वात लोकप्रिय ट्रॅक, ट्रायंड ट्रॅकवर कॅम्पिंगचा आनंद देखील घेता येतो.

Summer Travel: हिटवेव्ह अलर्ट! उन्हाळ्यात या ठिकाणांना भेट देणार असाल तर प्लॅन करा रद्द

जैसलमेर

जर तुम्हाला वाळवंटात कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल तर राजस्थानमधील जैसलमेरमध्ये जा. कॅम्पिंगसाठी जैसलमेर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये कॅम्पिंग, वाळवंट सफारी, उंटाची सवारी, लोकप्रिय नृत्य आणि संगीत कार्यक्रम हा एक मजेदार अनुभव असेल.

WhatsApp channel
विभाग