Hottest Place In India: मे महिना सुरु होताच गरमीचा पारा फारच वाढला आहे. भारतात उष्णतेचा कहर सातत्याने वाढत आहे. देशातील काही राज्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. गेल्या आठवड्यापासून हीच परस्थिती आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि सिक्कीममध्ये उष्णतेचा प्रकोप वाढू शकतो. उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या लागतात. त्यामुळे सहाजिकच फिरण्याचे प्लॅन बनवले जातात. पण वरती सांगितलेल्या राज्यांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर यावेळी येथे न गेलेलेच बरे. जाणून घेऊया या राज्यांच्या हवामानाची स्थिती...
लोकांचे आवडते समर डेस्टिनेशन सिक्कीम हे देखील उष्णतेच्या लाटेत सापडले आहे. सिक्कीम हा पर्वत आणि हिरवाईने वेढलेला असला तरी, यावेळी सिक्कीममध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अहवालानुसार सिक्कीमला येत्या दोन ते तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.
राजधानी दिल्लीतही आगीचा जोरदार पाऊस सुरू आहे. येथील तापमान सामान्यपेक्षा ५ अंशांनी वर गेले आहे. आरोग्य तज्ञांनी दिल्लीतील लोकांना शक्य तितके हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्येही उष्म्याचा तडाखा बसला आहे. म्हणून, जर तुम्ही येथे भेट देण्याचा विचार करत असाल तर ते त्वरित रद्द करा. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक भागात खूप उष्ण आहे. मंगळवारी येथे अनेक ठिकाणी ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. म्हणूनच तुम्ही आंध्र प्रदेशला भेट देण्याचा प्लॅन पुढे ढकलू शकता.