मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tea After Eating: जेवल्यानंतर चहा पिऊ नका, आरोग्यावर होऊ शकतात नकारात्मक परिणाम!

Tea After Eating: जेवल्यानंतर चहा पिऊ नका, आरोग्यावर होऊ शकतात नकारात्मक परिणाम!

Dec 06, 2022, 11:28 AM IST

    • Health Care: जेवणानंतर चहा प्यायल्यास आरोग्याला हानी पोहोचते. नक्की काय तोटे होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
जेवल्यानंतर चहा पिणे (Freepik )

Health Care: जेवणानंतर चहा प्यायल्यास आरोग्याला हानी पोहोचते. नक्की काय तोटे होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

    • Health Care: जेवणानंतर चहा प्यायल्यास आरोग्याला हानी पोहोचते. नक्की काय तोटे होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Drinking Tea After Eating: काही लोकांना अशी सवय असते की ते दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितात. पण जेवल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जेवल्यानंतर चहा पिण्याचे तोटे जाणून घेणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की, जर तुम्ही जेवण केल्यानंतर चहाचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला काय हानी पोहोचवू शकते. जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

Kurti Style Mistakes: कुर्ती घालताना चुकूनही करू नका या चुका, खराब होईल तुमची स्टाईल

Cooking Tips: घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स, मिळेल बाजारासारखी टेस्टी चव

Cucumber Benefits: उन्हाळ्यात आरोग्यासाठी वरदान आहे काकडी, वेट लॉस पासून बीपीपर्यंत ठेवते नियंत्रित

Corn Chaat: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी खा कॉर्न चाट, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

१) माणसाने जेवणानंतर कधीही चहा पिऊ नये. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवू शकते. कारण याच्या आत कॅफिन असते, ज्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

२) जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास लोकांना हृदयविकाराचा होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.

३) जर एखाद्या व्यक्तीने जेवल्यानंतर लगेच चहा घेतला तर त्या व्यक्तीला पचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

४) डोकेदुखीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवल्यानंतर लगेच चहाचे सेवन करू नका. अन्यथा, एखाद्या व्यक्तीला मायग्रेनच्या समस्येला देखील सामोरे जावे लागू शकते.

५) जर एखाद्या व्यक्तीने जेवल्यानंतर लगेच चहा घेतला तर त्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची समस्या निर्माण होऊ शकते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

 

विभाग