मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: अखेर अश्विनी समोर येणार मयुरी-प्रतीकच्या नात्याचं सत्य! ‘तू चाल पुढं’मध्ये नवा ट्वीस्ट

Tu Chal Pudha: अखेर अश्विनी समोर येणार मयुरी-प्रतीकच्या नात्याचं सत्य! ‘तू चाल पुढं’मध्ये नवा ट्वीस्ट

Jun 03, 2023, 04:16 PM IST

  • Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला त्रास देण्यासाठी प्रतीकवर दबाव टाकून मयुरीला गुंगीचं औषध देणाऱ्या शिल्पीने आता प्रतीकलाच या प्रकरणात अडकवलं आहे.

Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला त्रास देण्यासाठी प्रतीकवर दबाव टाकून मयुरीला गुंगीचं औषध देणाऱ्या शिल्पीने आता प्रतीकलाच या प्रकरणात अडकवलं आहे.

  • Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला त्रास देण्यासाठी प्रतीकवर दबाव टाकून मयुरीला गुंगीचं औषध देणाऱ्या शिल्पीने आता प्रतीकलाच या प्रकरणात अडकवलं आहे.

Tu Chal Pudha Latest Episode: तू चाल पुढं’ या मालिकेच्या कथानकात आता आणखी एक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. शिल्पीच्या कारस्थानात सहभाग घेण्यास नकार दिल्याने आता प्रतीक एका मोठ्या अडचणीत अडकला आहे. अश्विनीला त्रास देण्यासाठी प्रतीकवर दबाव टाकून मयुरीला गुंगीचं औषध देणाऱ्या शिल्पीने आता प्रतीकलाच या प्रकरणात अडकवलं आहे. इतकंच नाही तर, प्रतीकने मयुरीला कसं फसवलं आणि तिचा गैरफायदा घेतला याचं खोटं चित्र तिने अश्विनीसमोर उभं केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पी सतत नवनवे डाव रचताना दिसत आहे. अश्विनी घरी नसल्याचा फायदा घेत शिल्पीने प्रतीकवर दबाव आणून आणि मयुरीला जीवे मारण्याची धमकी देवून तिने आपला डाव सफल करण्याची योजना आखली होती. यासाठी तिने पप्रतीकला अगदी हतबल केलं. मात्र, काहीही झालं तरी आपण मयुरीला त्रास देणार नाही आणि तिला फसवणार देखील नाही, हे ठरवलेल्या प्रतीकने शिल्पीच्या डावात सामील होण्यास सरळ नकार दिला. प्रतीकचा नकार ऐकून शिल्पी मात्र संतापली आहे. याचाच बदल म्हणून तिने आता प्रतीक विरोधात डाव रचत त्यालाच सगळ्या प्रकरणात अडकवले आहे.

Rang Maza Vegla: कार्तिकचं सत्य समजूनही दीपा देणार साथ; ‘रंग माझा वेगळा’मध्ये दिसणार भावनिक बंध!

नाशिकला असलेल्या अश्विनीला फोन करून शिल्पीने तिचे कान भरले. स्वतः रचलेल्या या डावात प्रतीकला अडकवण्यासाठी तिने त्याला एका ठिकाणी बोलवले आणि अश्विनीला देखील तिथेच लपून राहायला सांगितले. तर, यावेळी शिल्पीने स्वतः रचलेल्या डावाचा सगळा दोष प्रतीकवर ढकलून त्याने मयुरीचा कसा गैरफायदा घेतला, असं खोटं चित्र तिने अश्विनीसमोर उभं केलं आहे. प्रतीकबद्दल ऐकताच अश्विनीचा देखील मोठा गैरसमज झाला आहे. प्रतीकचं हे रूप पाहून अश्विनीला देखील धक्का बसला. या पुढे मयुरीच्या आस-पास देखील दिसायचं नाही, अशी तंबीच तिने प्रतीक दिली.

आता अश्विनी मयुरीच्या तोंडून देखील या नात्याचं सत्य वदवून घेणार आहे. यावेळी मयुरी आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे. तर, मयुरी आपल्याशी खोटं बोलली हे ऐकून आता अश्विनीचा संताप देखील अनावर होणार आहे. आता ती पुढे काय करणार हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

विभाग