Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत पुन्हा एकदा नात्यांचं महत्त्व पाहायला मिळणार आहे. एकीकडे कार्तिक दीपाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे दीपा मात्र सगळ्या गोष्टी कळून देखील त्याची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ती सतत कार्तिकला धीर देताना दिसत आहे. आता कार्तिकला सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा दीपा प्रयत्न करताना दिसणार आहे. घाटगे वकीलाने सत्य सांगितल्यापासून दीपा आयेशाविरोधातील पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
कार्तिक आणि दीपा इनामदार यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी घाडगे वकिलाने आता आयेशा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरलं होतं. एकाच दगडात दोन पक्षी मारता यावेत असा डाव त्याने आखला होता. मात्र, आता त्याचा हाच डाव त्याच्यावर उलटला आहे. एकीकडे त्याने आयेशाला एका गुन्हातून बाहेर काढून तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. दीपाची मैत्रीण साक्षी हिचा खून कार्तिकने नव्हे तर, आयेशाने केला आहे, हे सत्य आता तो दीपाला सांगून टाकणार आहे. घाडगे वकिलाने स्वतःच्या डावात आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन याला देखील सामील करून घेतलं होतं. मात्र, आता हा खेळ त्याच्या जीवावर बेतणार आहे.
आपण आता जगू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर आता घाडगे वकील दीपाला सत्य सांगितले आहे. जखमी अवस्थेत दीपाला शोधात तो मंदिरात पोहोचला होता. या वेळी त्याने अक्षरशः दीपाच्या पायाशी लोळण घेतली होती. तर, साक्षीचा खून कार्तिकने नाही तर, आयेशाने केला आहे, हे सत्य सांगितले आहे. तर, आयेशाच्या या काळ्या कारनाम्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. मात्र, हा पेन ड्राईव्ह नेमका कुठे आहे, हे सांगण्या आधीच त्याचा मृत्यू झाला आहे.
आता दीपा हे सत्य कळल्यानंतर कार्तिकला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा एकदा सगळे प्रयत्न करणार आहे. यावेळी दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.