मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: 'पठाण' हिट ठरूनही शाहरुख नंबर वन नाही! 'या' अभिनेत्रीने मारली बाजी

Pathaan: 'पठाण' हिट ठरूनही शाहरुख नंबर वन नाही! 'या' अभिनेत्रीने मारली बाजी

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 23, 2023, 10:05 AM IST

  • Top Trending Celebrity: नुकताच भारतातील सेलिब्रिटींची एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटींचा समावेश आहे. चला पाहूया ही यादी...

टॉप ट्रेंडिग सेलिब्रिटी (HT)

Top Trending Celebrity: नुकताच भारतातील सेलिब्रिटींची एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटींचा समावेश आहे. चला पाहूया ही यादी...

  • Top Trending Celebrity: नुकताच भारतातील सेलिब्रिटींची एक यादी समोर आली आहे. या यादीमध्ये टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटींचा समावेश आहे. चला पाहूया ही यादी...

बॉलिवूड कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. त्यांची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने तर जगभरात १००० कोटी रुपयांचा गल्ला जमावर हे सिद्ध करुन दाखवले आहे. आता भारतातील टॉप २० ट्रेंडिंग कलाकारांच्या यादी समोर आली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोण कितव्या क्रमांकावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

IMDBने नुकताच एक सर्वे केला आहे. या सर्वेमधून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणते भारतीय सेलिब्रिटी ट्रेंडिंगमध्ये होते हे समोर आले आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला राखी खन्नाने टक्कर दिली आहे. तर नोरा फतेही चक्क २०व्या क्रमांकावर आहे.
वाचा: इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता अभिनेता, नाईलाजास्तव दिग्दर्शकानं उचललं 'हे' पाऊल

टॉप २० ट्रेंडिंग सेलिब्रिटी:

१. राशी खन्ना

२. शाहरूख खान

३. विजय सेतूपथी

४. रेजिना कॅसांड्रा

५.आदित्य चोप्रा

६. दीपिका पादूकोण

७. कादर खान

८. भुवन अरोरा

९. अनुपम खेर

१०. कियारा अडवानी

११. आएशा कांगा

१२. ऐश्वर्या राय बच्चन

१३. शाहीद कपूर

१४. कुब्रा सेत

१५. राम चरण तेजा

१६. अंजली सिवाराम

१७. सलमान खान

१८. यश चोप्रा

१९. कृष्ण डी के

२०. नोरा फतेही

टॉप ट्रेंडिगमध्ये असलेल्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकताच समोर आली आहे. या यादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

‘पठाण’ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड
शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाने केवळ हिंदीमध्ये ५०० कोटींची कमाई केली नाही, तर हा जादुई आकडा सर्वात जलद गतीने गाठणारा पहिला चित्रपटही ठरला. ‘पठाण’ने २८ दिवसांत हा विक्रम केला आहे. कमाईच्या बाबतीत ‘पठाण’ने ‘बाहुबली २’ला मात दिली आहे. एसएस राजामौलींचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली २’ने हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर ३४ दिवसांत ५०० कोटींची कमाई केली होती. मात्र, शाहरुख खानच्या ‘पठाण’ने हा विक्रम मोडीत काढला आहे.

विभाग