मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Intimate Scenes: इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता अभिनेता, नाईलाजास्तव दिग्दर्शकानं उचललं 'हे' पाऊल

Intimate Scenes: इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता अभिनेता, नाईलाजास्तव दिग्दर्शकानं उचललं 'हे' पाऊल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 22, 2023 12:20 PM IST

Intimate Scenes: छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये हे सांगितले आहे.

डियर इश्क
डियर इश्क (HT)

अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन हे हमखास दाखवले जातात. हे सीन दिसताना अगदी सोपे दिसतात मात्र ते शूट करताना भल्याभल्या कलाकारांना घाम फुटतो. असेच काहीचे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यासोबत झाले आहे. अभिनेता इंटिमेट सीन शूट करताना लाजत होता. त्यामुळे दिग्दर्शकाने मोठे पाऊल उचललं आहे.

डियर इश्क या मालिकेच्या शुटिंग दरम्यान अभिनेता सेहबान आजम लाजत होता. त्याला मालिकेतील नायिका प्रीती कौरसोबत इंटिमेट सीन देणे कठीण झाले होते. त्याने दिग्दर्शकांना सांगून सीन शूट करण्यास नकार दिला होता. मात्र दिग्दर्शकाने यावर शक्कल लढवून मार्ग काढला आहे.
वाचा: हृतिक की दिलजीत कोण आवडतं?; कंगनाने दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

सेहबान आझमने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने इंटिमेट सीन शूट करण्याचा अनुभव सांगितला आहे. 'मी इंटिमेट सीन शूट करताना घाबरतो. या मागचे पहिले कारण म्हणजे मी खूप लाजाळू व्यक्ती आहे. दुसरे कारण म्हणजे माझ्याकडे या फिल्डमधील फारसा अनुभव नाही. त्यामुळे इंटिमेट सीन शूट करणे माझ्यासाठी कठीण होऊन जाते' असे आझमने म्हटले.

पुढे तो म्हणाला, 'नंतर दिग्दर्शकाने सीन शूट करतानाचे वातावरण सांभाळले. ज्या खोलीमध्ये आम्ही शूट करत होतो तेथील काहींना खोलीमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मी तो इंटिमेट सीन शूट केला.'

सेहबान अजीम हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने काही हिट मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. डियर इश्क या मालिकेशिवाय त्याने हजारों में मेरी बहना है, थपकी प्यार की, तुझसे है राबता या मालिकांमध्येही काम केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग