मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejaswini Pandit: शापित आहे म्हणे...; तेजस्विनी पंडितच्या नव्या वेब सीरिजचा टीझर चर्चेत

Tejaswini Pandit: शापित आहे म्हणे...; तेजस्विनी पंडितच्या नव्या वेब सीरिजचा टीझर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 05, 2022, 12:50 PM IST

    • Tejaswini Pandit Upcoming series: तेजस्विनी पंडितची 'अथांग' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अथांग (HT)

Tejaswini Pandit Upcoming series: तेजस्विनी पंडितची 'अथांग' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    • Tejaswini Pandit Upcoming series: तेजस्विनी पंडितची 'अथांग' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित (Tejashwini pandit) ओळखली जाते. तिच्या 'रानबाजार' ही सीरिज भलतीच गाजली होती. त्यानंतर आता एक नवीकोरी वेब सीरिज घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचे नाव 'अथांग' असे आहे. या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

'अथांग'चा रंजक व उत्कंठावर्धक टीझर पाहून वेबसीरिज पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. वेबसिरीजचा टीझर पाहताना 'अथांग' वेब सीरिज हॉरर की थ्रिलर? असा प्रश्न पडतो. या सीरिजमध्ये एका शापित कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एक तरल प्रेमकथाहीपाहायला मिळेल.
वाचा : ‘हे’ आहेत बिग बॉस मराठी ४चे स्पर्धक, पाहा यादी

वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरिज 'अथांग.' या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलंय. या सीरिजमध्येसंदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांची फौज झळकणार आहे.

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "आतापर्यंत प्लॅनेट मराठीनं अशा प्रकारच्या आशयाची निर्मिती केलेली नाही. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि मागणीनुसार आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाची निर्मिती करतो. 'अथांग' ही त्यापैकीच एक आणि प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल. तेजस्विनी पंडित उत्तम अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण आहे. प्लॅनेट मराठीच्या गाजलेल्या 'अनुराधा' आणि 'रानबाजार' या वेबसीरीजमध्ये तिनं जबरदस्त परफॉर्मंस दिलाय. उत्तम अभिनेत्री सोबतच ती एक ताकदीची निर्मितीसुद्धा आहे. तिला आशयाची जाण असल्याने ही वेबसिरीज सर्वांचे लक्ष वेधून घेईल."