मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lokesh Rajendran: अभिनेता लोकेश राजेंद्रनने केली आत्महत्या

Lokesh Rajendran: अभिनेता लोकेश राजेंद्रनने केली आत्महत्या

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 06, 2022, 10:47 AM IST

    • Lokesh Rajendran Death: गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता.
लोकेश राजेंद्रन (HT)

Lokesh Rajendran Death: गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता.

    • Lokesh Rajendran Death: गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता.

तामिळ इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता लोकेश राजेंद्रनने आत्महत्या केली आहे. मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी राजेंद्रनने अखेरचा श्वास घेतला. राजेंद्रन ३४ वर्षांचा होता. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

'मरमादेशम' या मालिकेत राजेंद्रनने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. जवळपास १५० मालिकांमध्ये त्याने काम केले. त्याचे काही चित्रपटही हिट ठरले होते. राजेंद्रन विवाहित होता. त्याला दोन मुले देखील होती.

लोकेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यामध्ये होता. वडिलांनी लोकेशशी शुक्रवारी संवाद साधला होता. तसेच त्यांच्यावर आर्थिक संकट देखील कोसळले होते. वडिलांनी लोकेशला आर्थिक मदत देखील केली होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशला कौटुंबीक समस्यांमुळे दारुचे व्यसन लागले होते. अनेकदा दारुच्या नशेत त्याला चेन्नई मुफस्सिल बस टर्मिनल येथे झोपलेले पाहिले गेले. ३ ऑक्टोबर रोजी त्याची प्रकृती ठिक नसल्याचे बस स्टॉपवरील लोकांच्या लक्षात आले होते. काहींनी रुग्णवाहिकेला बोलावले होते आणि याबाबत पोलिसांना देखील माहिती दिली होती.

लोकेशला राजकीय किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले. कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

विभाग