मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘ॲमिशॉर्ट’ महोत्सवात विद्यार्थ्यांसमोर उघडला इराणी लघुपटांचा खजिना

‘ॲमिशॉर्ट’ महोत्सवात विद्यार्थ्यांसमोर उघडला इराणी लघुपटांचा खजिना

HT Marathi Desk HT Marathi

Feb 22, 2023, 07:29 PM IST

    • मुंबईतील ‘ॲमिटी’ युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच ‘ॲमिशॉर्ट २०२३’ हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. ‘फोकस कंट्री' म्हणू इराणचे लघुपट दाखवण्यात आले.
Short Film Festival in Amity University, Mumbai

मुंबईतील ‘ॲमिटी’ युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच ‘ॲमिशॉर्ट २०२३’ हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. ‘फोकस कंट्री' म्हणू इराणचे लघुपट दाखवण्यात आले.

    • मुंबईतील ‘ॲमिटी’ युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच ‘ॲमिशॉर्ट २०२३’ हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. ‘फोकस कंट्री' म्हणू इराणचे लघुपट दाखवण्यात आले.

मुंबईतील ‘ॲमिटी’ युनिव्हर्सिटीमध्ये नुकताच ‘ॲमिशॉर्ट २०२३’ हा पहिलावहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या महोत्सवात जगभरातील निवडक पुरस्कारप्राप्त लघुपट विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आले. अभिनेत्री तनिशा मुखर्जीच्या ‘अग्नी दाह’ (२०२२) या चित्रपटाने या दोन दिवसीय महोत्सवाला सुरूवात झाली. यंदा ‘ॲमिशॉर्ट २०२३’मध्ये फोकस कंट्री म्हणू इराणचे पाच लघुपट दाखवण्यात आले. इराण कल्चर हाऊस, मुंबईचे संचालक ओमानोल्लाह सयादी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. शिवाय जर्मनी, अमेरिका, अर्जेंटीना आदी देशातल्या सिनेमांसहित भारतातल्या पुरस्कार विजेत्या सिनेमांचा समावेश करण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

ये राम तो रॅम्बो निकला रे! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अभिरामचा डॅशिंग अंदाज पाहून लीलाही हैराण!

तयार राहा... ‘बाहुबली’ पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी प्रेक्षकांना दिलं तगडं सरप्राईज! नव्या प्रोजेक्टची घोषणा

प्रसिध्द लेखक आणि सिने-समीक्षक अशोक राणे महोत्सवात पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘लघुपट ही फिचर फिल्म बनवण्याकडे वळण्याची पहिली पायरी नाही. तर लघुपटाचं वेगळं मार्केट जगभरात आहे. तरुण विद्यार्थ्यांनी या मार्केटचा अभ्यास करावा. पण फक्त फिल्म बनवून विकण्यापेक्षा ती तयार करण्याची प्रक्रिया आयुष्यभर पूरणारा अनुभव देऊन जाते’ असा सल्ला राणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ॲमिटी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नाळ जागतिक सिनेमांशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचं मत कुलगुरू डॉ. ए. डब्ल्यू. संतोषकुमार यांनी सांगितलं. जगभरात नक्की काय सुरू आहे, वेगवेगळ्या देशातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी आणि याबद्दल तिथल्या सिनेमांत दिसणारं या सर्वांचं प्रतिबिंब हे या फेस्टिव्हलच्या निमित्तानं अनुभवण्यास मदत झाली, असं संतोषकुमार म्हणाले.

दिग्दर्शक योगेंद्र चौबलसोबत अभिनेत्री तनिशा मुखर्जी, चंद्रकांता फेम यक्कू म्हणजेच अभिनेता अखिलेंद्र मिश्रा, ‘डॉक्टर जी’ (१९९९) सिनेमाफेम अभय चिंतामणी मिश्र आणि जिग्ना त्रिवेदी यांनीही या लघुपट महोत्सवाला हजेरी लावली. तुकाराम सिनेमानं १९३९ मध्ये व्हेनीस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजवला. हे सांगताना मिश्रा यांनी ‘लगान’, ‘लंच बॉक्स’ आणि आता आलेल्या ‘कंतारा’ सिनेमांची उदाहरणं दिली. सिनेमा आपल्या मातीशी जोडणारा हवा. म्हणजे अगदी जगातल्या प्रत्येक माणसाला कनेक्ट करतो हे अखिलेश मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

‘वारसा’ (२०२२) या फिल्मद्वारे महोत्सवाची सांगता झाली. पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्याचा ॲमिटी विद्यापीठाचा प्रयत्न असल्याची माहिती कुलगुरू डॉ. संतोषकुमार यांनी यावेळी दिली.

 

विभाग