मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: 'मन्नत'मध्ये घुसले दोन अज्ञात व्यक्ती, कुठे होता शाहरुख?

Shah Rukh Khan: 'मन्नत'मध्ये घुसले दोन अज्ञात व्यक्ती, कुठे होता शाहरुख?

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 03, 2023, 03:33 PM IST

    • Mannat: गुरुवारी शाहरुखच्या मन्नत बंगल्यात दोन तरुणींनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
शाहरुख खान (HT)

Mannat: गुरुवारी शाहरुखच्या मन्नत बंगल्यात दोन तरुणींनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

    • Mannat: गुरुवारी शाहरुखच्या मन्नत बंगल्यात दोन तरुणींनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख हा सतत चर्चेत असतो. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. बऱ्याचदा शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, दोन अज्ञात व्यक्तींना चक्क मन्नतच्या आत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, हे सगळं घटत असताना शाहरुख कुठे होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

शाहरुखच्या बंगल्यात दोन तरुणांनी मध्यरात्री भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. दोन तरुण गुजरातमधील आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोन्ही तरुणांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २० वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे. गुरुवारी ही घटना घडला.
वाचा: ‘कच्चा बादाम’ फेम भुबनचे दिवस फिरले! रडत व्हिडीओ केला शेअर

सूत्रांनी ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी ही घटना घडली तेव्हा शाहरुख बंगल्यात नव्हता. तो त्याचा आगामी चित्रपट 'जवान'चे शूटिंग करत होता. पहाटे शाहरुख शुटिंग संपवून घरी आला आणि झोपला. तोपर्यंत सिक्युरिटी स्टाफने घरात घुसणाऱ्या दोन्ही तरुणांना पोलिसांच्या हवाले केले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण हे शाहरुखचे चाहते आहेत. ते गुजरातवरुन शाहरुखला भेटण्यासाठी आले आहेत. मात्र, विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

विभाग