मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samaira: 'समायरा'सोबत पुण्यातील महिलाही बाईकवर स्वार

Samaira: 'समायरा'सोबत पुण्यातील महिलाही बाईकवर स्वार

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 23, 2022, 10:08 AM IST

    • स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची कथा दाखवण्यात आली आहे.
'समायरा'सोबत पुण्यातील महिलाही बाईकवर स्वार

स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची कथा दाखवण्यात आली आहे.

    • स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची कथा दाखवण्यात आली आहे.

ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'समायरा'च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे. याच चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली. केतकी नारायण तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अव्हेंजर बाईक चालवताना दिसते आहे. स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची ही कथा आहे. नुकतीच केतकीने पुण्यात सर्व महिलांबरोबर बाईक चालवली. ह्या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांचा सहभाग होता.

ट्रेंडिंग न्यूज

अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट

कुणालच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चैतन्यसोबत सुभेदार कुटुंबही झालं सज्ज! ‘ठरलं तर मग’मध्ये रोमांचक वळण

भारतीय क्रिकेट टीमसाठी ‘अश्वत्थामा’ बनले अमिताभ बच्चन! सोशल मीडियावरील Viral Video पाहिलात का?

नैना लग्नाला पोहोचणारच नाही असा राहुलने आखला डाव, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय घडणार?

याबद्दल केतकी नारायण म्हणते, " 'समायरा' ही एक सोलो ट्रिपवर असलेल्या मुलीची कथा आहे. सगळ्याच महिला आपापल्या आयुष्यात फायटर असतात. सर्व जबाबदाऱ्या त्या अगदी चोखपणे पार पडतात व आपल्यासोबत आपल्या परिवाराला ही पुढे घेऊन जातात. आजच्या या बाईक रॅलीत मी या सर्व स्ट्रॉंग महिलांबरोबर माझे 'समायरा' हे निर्भीड पात्र प्रेक्षकांच्या समोर आणले. माझ्यासोबतच पुण्यातील महिलांनीही या बाईक रॅलीचा आनंद लुटला."

ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.

विभाग