मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ray Stevenson: ‘आरआरआर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; राजमौलींनी व्यक्त केला शोक!

Ray Stevenson: ‘आरआरआर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; राजमौलींनी व्यक्त केला शोक!

May 23, 2023, 11:07 AM IST

  • Ray Stevenson Death: रे स्टीव्हन्सनने ‘आरआरआर’ या चित्रपटात गव्हर्नर स्कॉटची भूमिका साकारली होती. खलनायकाच्या भूमिकेत त्याचा अभिनय चांगलाच गाजला.

Ray Stevenson

Ray Stevenson Death: रे स्टीव्हन्सनने ‘आरआरआर’ या चित्रपटात गव्हर्नर स्कॉटची भूमिका साकारली होती. खलनायकाच्या भूमिकेत त्याचा अभिनय चांगलाच गाजला.

  • Ray Stevenson Death: रे स्टीव्हन्सनने ‘आरआरआर’ या चित्रपटात गव्हर्नर स्कॉटची भूमिका साकारली होती. खलनायकाच्या भूमिकेत त्याचा अभिनय चांगलाच गाजला.

Ray Stevenson Death: दक्षिण चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आरआरआर’ फेम अभिनेता रे स्टीव्हनसन याचे निधन झाले आहे. अभिनेता रे स्टीव्हन्सन ‘आरआरआर’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. या अभिनेत्याने वयाच्या ५८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिनेत्याच्या निधनाची ही बातमी एसएस राजामौली यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी ट्विट करून आपले दुःख व्यक्त केले आहे. रे स्टीव्हन्सनच्या निधनामुळे एसएस राजामौली यांना देखील धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वातीने चहामध्ये टाकले औषध, मुक्ताला कळताच...; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पुढे काय होणार?

'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

एसएस राजमौली यांनी म्हटले की, रे चित्रपटाच्या सेटवर एक नवी ऊर्जा घेऊन यायचा. राजामौली यांनी रे याच्यासोबत काम करतानाचा त्यांचा अनुभव हा निखळ आनंद असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्याच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करतानाच दिग्दर्शकाने त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे. या पोस्टसह, एसएस राजामौली यांनी रे स्टीव्हनसनसोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो ‘आरआरआर’च्या सेटवरचा आहे. रे स्टीव्हन्सनने या चित्रपटात गव्हर्नर स्कॉटची भूमिका साकारली होती. खलनायकाच्या भूमिकेत त्याचा अभिनय चांगलाच गाजला.

अभिनेता रे स्टीव्हनसन याने रविवारी अखेरचा श्वास घेतला. मार्व्हलच्या ‘थॉर’ चित्रपटामधील ‘वोल्स्टॅग’च्या भूमिकेसाठीही हा अभिनेता कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील. रे स्टीव्हन्सनने ‘पनीशर: वॉर झोन’, ‘किल द आयरिश मॅन’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. मीडिया रिपोर्टनुसार, रे स्टीव्हनसन त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रे स्टीव्हनसन यांच्या निधनाच्या मनोरंजन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे.

विभाग