मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Box Office: रॉकेट्री' पुढे 'खुदा हाफिज २' ने टेकले गुडघे, काय आहेत 'थॉर' चे हाल

Box Office: रॉकेट्री' पुढे 'खुदा हाफिज २' ने टेकले गुडघे, काय आहेत 'थॉर' चे हाल

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 09, 2022, 08:10 PM IST

    • (box office collection of rocketry and khuda haffiz 2)विदयुत जामवाल याच्या 'खुदा हाफिज २' साठी चित्रपटगृह चालकांनी 'रॉकेट्री' चे शो कमी करून अर्ध्यावर आणले होते. मात्र तरीही 'खुदा हाफिज २' ला त्याचा काही खास फायदा झालेला दिसत नाही.
box office collection of rocketry and khuda haffiz 2

(box office collection of rocketry and khuda haffiz 2)विदयुत जामवाल याच्या 'खुदा हाफिज २' साठी चित्रपटगृह चालकांनी 'रॉकेट्री' चे शो कमी करून अर्ध्यावर आणले होते. मात्र तरीही 'खुदा हाफिज २' ला त्याचा काही खास फायदा झालेला दिसत नाही.

    • (box office collection of rocketry and khuda haffiz 2)विदयुत जामवाल याच्या 'खुदा हाफिज २' साठी चित्रपटगृह चालकांनी 'रॉकेट्री' चे शो कमी करून अर्ध्यावर आणले होते. मात्र तरीही 'खुदा हाफिज २' ला त्याचा काही खास फायदा झालेला दिसत नाही.

गेल्या आठवड्यात १ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या आर माधवनच्या 'रॉकेट्री' पुढे ८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'खुदा हाफिज ३' ने गुडघे टेकले आहेत असं म्हणायला हरकत नाही. विदयुत जामवाल याच्या 'खुदा हाफिज २' साठी चित्रपटगृह चालकांनी 'रॉकेट्री' चे शो कमी करून अर्ध्यावर आणले होते. मात्र तरीही 'खुदा हाफिज २' ला त्याचा काही खास फायदा झालेला दिसत नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केलेली बॉक्स ऑफिस कमाई ही 'रॉकेट्री' च्या आठव्या दिवसाच्या कमाईच्या बरोबरीने देखील नाही. त्यामुळे विद्युतचा 'खुदा हाफिज २' पुढे किती कमाई करेल यावर शंका वर्तवली जातेय. तरीही शनिवारी आणि रविवारी याची कमाई वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

चित्रपट समीक्षकांच्या अंदाजानुसार 'खुदा हाफिज २'ने पहिल्या दिवशी किमान ४ कोटींची कमाई करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांचा अंदाज चुकवत या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १ कोटीची कमाई केली आहे. तर दुसरीकडे माधवनचा 'रॉकेट्री' ने खुदा हाफिज २' समोर घट्ट पाय रोवून उभा राहिलाय. 'रॉकेट्री' ला देशभरात कमी शो मिळाले असूनही या चित्रपटाने आठव्या दिवशी १ कोटी ३८ लाखांची कमाई केली आहे. 'रॉकेट्री' ने पहिल्या आठवड्यात १५ कोटींची कमाई केली आहे. या सोबतच मार्व्हेल चाहत्यांसाठी क्रिस हेम्सवर्थ चा ‘थॉर लव एंड थंडर’ देखील प्रदर्शित झाला आहे.

क्रिस हेम्सवर्थ च्या 'थॉर' ने पहिल्या दिवशी १८ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळालीये. तर दुसरीकडे 'जुग जुग जियो' ने दुसऱ्या आठवड्यात २० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यत या चित्रपटाने ८० कोटींची कमाई केली आहे.

विभाग