मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rocketry Box Office: माधवनचा रॉकेट्री रॉकेटप्रमाणेच सुसाट, वाचा आतापर्यंतची कमाई

Rocketry Box Office: माधवनचा रॉकेट्री रॉकेटप्रमाणेच सुसाट, वाचा आतापर्यंतची कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Jul 03, 2022, 01:05 PM IST

    • Rocketry Box Office collection: माधवनची भूमिका असलेला हा चित्रपट रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची कथा आहे, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत हेरगिरीच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. माधवन व्यतिरिक्त, अभिनेता शाहरुख खान आणि सुर्या देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.
Rocketry Box Office

Rocketry Box Office collection: माधवनची भूमिका असलेला हा चित्रपट रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची कथा आहे, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत हेरगिरीच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. माधवन व्यतिरिक्त, अभिनेता शाहरुख खान आणि सुर्या देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

    • Rocketry Box Office collection: माधवनची भूमिका असलेला हा चित्रपट रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची कथा आहे, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत हेरगिरीच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. माधवन व्यतिरिक्त, अभिनेता शाहरुख खान आणि सुर्या देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आर माधवन याचा 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. माधवनने चित्रपटाचं दिग्दर्शन, लेखन केलं आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या अनोख्या प्रयोगाला आता प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. शुक्रवारी चित्रपटाने केलेल्या कमाईच्या तुलनेत शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडल्याची चित्र आहेत. सोबतच रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. माधवनच्या 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट ' चित्रपटाची तुलना प्रेक्षक 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन सोबत करताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने देखील सुरुवातीला फारशी कामाची केली नव्हती. मात्र माऊथ पब्लिसिटीद्वारे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. तसंच काही याही चित्रपटाच्या बाबतीत पाहायला मिळतंय. रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय प्रेक्षकांना पसंत पडत आहे. हा चित्रपटही प्रेक्षकांच्या कौतुकातून इतरांपर्यंत पोहोचत आहे. शनिवारी या चित्रपटाने शुक्रवारपेक्षा दुप्पट कमाई केली. शनिवारी चित्रपटाने १. ३० कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची एकूण दोन दिवसांची कमाई सुमारे २ कोटींवर पोहोचली आहे. परंतु, एका वेगळ्या विषयावर आधारलेल्या चित्रपटासाठी ही कमाई चांगली मानली जातेय.

रॉकेट्री एकाच वेळी तामिळ, हिंदी आणि इंग्रजीमध्ये बनवण्यात आला आहे. माधवनची भूमिका असलेला हा चित्रपट रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची कथा आहे, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत हेरगिरीच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. माधवन व्यतिरिक्त, अभिनेता शाहरुख खान आणि सुर्या देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटात फिलिस लोगान, व्हिन्सेंट रिओटा आणि रॉन डोनाची देखील आहेत. माधवन या चित्रपटात नंबी नारायणनची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे शूटिंग भारत, फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सर्बिया येथे झाले आहे.

विभाग