मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shamshera Collection Day 2: रणबीरच्या 'शमशेरा'च्या कमाईत घसरण

Shamshera Collection Day 2: रणबीरच्या 'शमशेरा'च्या कमाईत घसरण

Aarti Vilas Borade HT Marathi

Jul 24, 2022, 03:49 PM IST

    • Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली दिसत नाही.
शमशेरा (HT)

Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली दिसत नाही.

    • Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा शमशेरा हा चित्रपट २२ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली दिसत नाही.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा जवळपास चार वर्षांनंतर 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा बिग बजेट चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच वाणी कपूर, संजय दत्त (Sanjay Dutt), सौरभ शुक्ला आणि रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत. तर दिग्दर्शन करण मल्होत्राने केले आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास १५० कोटी रुपये आहे. पण आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे खरे नाव माहिती आहे का? तिच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया..

स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार जाणून घ्या

शमशेरा चित्रपटाने दोन दिवसात २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने १०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १० कोटी रुपये कमावले आहेत. एकंदरीत चित्रपट अपेक्षा पेक्षा कमी कमाई करत असल्याचे दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट १५ कोटी रुपयांची कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण तसे न होता चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळते.

काय आहे चित्रपटाची कहाणी?

शमशेरा चित्रपटात काझा या शहराची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट १८व्या शतकात घेऊन जातो. या चित्रपटात खमेरन जातीच्या लोकांची कथा दाखवण्यात आली आहे. हे लोक काझा या शहरात जातात तेव्हा तेथील उच्चवर्णीय लोक त्यांचा स्वीकार करत नाहीत. तेव्हा त्यांचा सरदार शमशेरा म्हणजेच रणबीर कपूर त्याच्या मित्रांसोबत उदर्निवाहसाठी लूटमार करण्यास सुरुवात करतो. काझामधील उच्चवर्णीय लोक शमशेराला कंटाळलेले असतात. ते अनेक ठिकाणी त्याची तक्रार करतात. नंतर सरकार इन्स्पेक्टर शुद्ध सिंग म्हणजेच संजय दत्तची काझामध्ये पोस्टींग करते.

शुद्ध सिंग चतुराईने शमशेरा आणि त्याच्या साथीदारांना काझा किल्ल्यात गुलाम बनवून ठेवतो. शमशेरा सर्वांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. नंतर चित्रपट २५ वर्षे पुढे जातो. तेव्हा चित्रपटात शमशेराला बिल्ली नवाचा मुलगा दाखवण्यात आला आहे. हा बिल्ली अगदी हुबेहुब वडिलांसारखा दिसतो. आता बिल्ली शुद्ध सिंगशी कसा लढणार? वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

विभाग