मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल नवी माहिती समोर; डॉक्टर म्हणतात ठीक होतील पण...

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल नवी माहिती समोर; डॉक्टर म्हणतात ठीक होतील पण...

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 23, 2022, 04:59 PM IST

    • Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास २ आठवडे झाले आहेत. राजू लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
राजू श्रीवास्तव

Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास २ आठवडे झाले आहेत. राजू लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

    • Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करून जवळपास २ आठवडे झाले आहेत. राजू लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव हे बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहेत. राजू यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका हॉटेलच्या जिममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून राजू यांच्या तब्येतीचे अपडेट्स येत आहेत. त्याचवेळी घरातील सदस्यही त्यांच्याबद्दल माहिती देत ​​असतात. राजू लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते खूप प्रार्थना करत आहेत. आता राजू यांच्या प्रकृतीबद्दल नवीन अपडेट मिळाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

राजू बरे होतील, असे आश्वासन डॉक्टरांनी दिल्याची माहिती राजू यांच्या प्रतिनिधींनी दिली आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल. एका वृत्तपत्रासोबत बोलताना ते म्हणाले, त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मात्र, अद्याप त्यांना शुद्ध आलेली नाही. ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. राजू बरे होतील, पण थोडा वेळ लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राजू यांच्या मुलीने दिली माहिती

त्याचवेळी राजू यांची मुलगी अंतरा हिने वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्याची प्रकृती सुधारण्याचीही ते वाट पाहत आहे आणि आम्ही डॉक्टरांकडून त्यांच्याबाबतच्या अपडेट्सची वाट पाहत आहोत. यापूर्वी, शेखर सुमन यांनी मित्र राजू यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट करत ट्विट केले होते आणि म्हटले होते, 'राजूचे अवयव चांगले काम करत आहेत. राजू अद्याप शुद्धीवर नसला तरी तो लवकरच बरा होईल, अशी आशा डॉक्टरांना आहे. महादेवाची कृपा.'

विभाग