मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raju Srivastava Property: कोट्यधीश होते कॉमेडियन राजू श्रीवास्तव; संपत्ती किती माहित्येय?

Raju Srivastava Property: कोट्यधीश होते कॉमेडियन राजू श्रीवास्तव; संपत्ती किती माहित्येय?

Payal Shekhar Naik HT Marathi
Sep 21, 2022 11:25 AM IST

Raju Srivastava Net Worth: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. रुग्णालयात दाखल केल्यापासून सोशल मीडियावर ते सतत चर्चेत होते. एका सर्वसामान्य तरुणाचा यशापर्यंतचा झालेला प्रवास सर्वांनाचा प्रेरणा देणारा आहे.

राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव

Raju Srivastav Net Worth: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं आज अखेर एम्स रुग्णालयात निधन झालं. गेली अनेक वर्षे लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा जिंदादिल कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यापासून राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजू यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असा आहे. त्यांनी आपल्या अंगभूत कलेच्या जोरावर अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवला होता.

राजू श्रीवास्तव यांच्या संपत्तीबद्दल नेटकरी सातत्यानं माहिती घेत होते. राजू श्रीवास्तव हे कोट्यधीश होते. केवळ आपल्या कलागुणांच्या जोरावर त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती सुमारे २० कोटी रुपये आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होस्टिंग, जाहिराती, रिअॅलिटी शो आणि स्टेज शो आहे. राजू श्रीवास्तव यांचं कानपूरमध्ये घर आहे. त्यांच्याकडं वेगवेगळ्या गाड्या आहेत. इनोव्हा, ऑडी Q7 आणि BMW 3 सीरीज अशा त्या आलिशान गाड्या आहेत. राजूच्या ऑडीची किंमत सुमारे ८२ लाख रुपये आणि BMW ची किंमत सुमारे ४७ लाख रुपये आहे.

दूरदर्शनच्या काळापासून राजू श्रीवास्तव हे मनोरंजन क्षेत्रात होते. त्यांचा चेहरा तसा सर्वांनाचा परिचित होता. परंतु 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतल्यानंतर ते खऱ्या अर्थानं घराघरांत गेले. 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉम्बे टू गोवा' आणि 'आमदानी अठ्ठनी खर्चा रुपैया' अशा काही चित्रपटांतही त्यांनी काम केलं. ते 'बिग बॉस' सीझन ३ मध्ये देखील सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे ते अध्यक्षही होते.

IPL_Entry_Point

विभाग