मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वर बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरे म्हणतात...

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'वर बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरे म्हणतात...

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 02, 2023, 08:39 AM IST

    • Raj Thackeray: राज ठाकरे यांनी नुकताच 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये हजेरी लावली. या शो मध्ये त्यांना केरळ स्टोरी बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
Raj Thackeray

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी नुकताच 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये हजेरी लावली. या शो मध्ये त्यांना केरळ स्टोरी बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

    • Raj Thackeray: राज ठाकरे यांनी नुकताच 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये हजेरी लावली. या शो मध्ये त्यांना केरळ स्टोरी बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला सुरुवातीला प्रचंड विरोध करण्यात आला. काही ठिकाणी चित्रपटावर बंदी घालण्यात आली. मात्र, या सगळ्याचा चित्रपटावर जराही परिणाम झाला नाही. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना द केरळ स्टोरी बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

सध्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाची प्रचंड चर्चा आहे. खुपते तिथे गुप्ते शोचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडला राज ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यांनी सूत्रसंचालक अवधूत गुप्तेच्या प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री, कोण आहे हा विराज?

अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना द केरळ स्टोरी बद्दल प्रश्न विचारला.. केरळ स्टोरी सिनेमावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली. तर सिनेमांवर बंदी घालणे योग्य कि अयोग्य? या प्रश्नावर राज ठाकरे उत्तर देत म्हणाले की, 'जर सेन्सॉरने सिनेमाला प्रमाणपत्र दिले असेल तर विरोध करणारा मी कोण.' आणि त्यांनी सिनेमाला विरोध करणे चुकीचे आहे असे सांगितले.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

विभाग