मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raada Teaser: कुठलंही काम 'आर नाहीतर पार' व्हायला पाहिजे; सोशल मीडियावर नुसता ‘राडा’

Raada Teaser: कुठलंही काम 'आर नाहीतर पार' व्हायला पाहिजे; सोशल मीडियावर नुसता ‘राडा’

Aarti Vilas Borade HT Marathi

Aug 30, 2022, 03:54 PM IST

    • तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे 'राडा' चित्रपटातून. टीझर पाहता चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे.
राडा (HT)

तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे 'राडा' चित्रपटातून. टीझर पाहता चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे.

    • तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे 'राडा' चित्रपटातून. टीझर पाहता चित्रपटात अॅक्शन सीन्सचा भरणा असल्याचे दिसत आहे.

फुल्ल ऑफ ऍक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. आता या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. थरारक दृश्ये, ऍक्शन सीन्स आणि बाजूला लव्हस्टोरी असलेल्या या टिझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

साखरपुडा मोडण्यासाठी राहुलने नैनाचे केले अपहरण, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत काय असेल कलाचे पुढचे पाऊल?

चित्रपटाचा टिझर पाहता साऊथ स्टाईलची कमतरता कुठेही भासत नाही आहे. तर कलाकारांच्याही यात दमदार भूमिका असणार आहेत, हे टिझरमधून प्रेक्षकांना कळाले आहे. राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे.

दिग्दर्शक रितेश सोपानराव नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे.

टिझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटातबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली असेल यांत शंकाच नाही. हा चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

विभाग