मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'रानबाजार'साठी प्राजक्ताने वाढवलं तब्बल ११ किलो वजन,ट्रान्सफॉर्मेशन पाहून म्हणाल

'रानबाजार'साठी प्राजक्ताने वाढवलं तब्बल ११ किलो वजन,ट्रान्सफॉर्मेशन पाहून म्हणाल

Payal Shekhar Naik HT Marathi

May 28, 2022, 02:58 PM IST

    • या वेबसीरिजमधील प्राजक्ताच्या लूकने जणू सोशल मीडियावर आग लावली होती. तिला अनेकांच्या वाईट कमेंटचा सामना करावा लागला होता.
प्राजक्ता माळी

या वेबसीरिजमधील प्राजक्ताच्या लूकने जणू सोशल मीडियावर आग लावली होती. तिला अनेकांच्या वाईट कमेंटचा सामना करावा लागला होता.

    • या वेबसीरिजमधील प्राजक्ताच्या लूकने जणू सोशल मीडियावर आग लावली होती. तिला अनेकांच्या वाईट कमेंटचा सामना करावा लागला होता.

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपला ठसा उमटवणारी आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने कित्येकांना कॉम्प्लेक्स देणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ताची 'रानबाजार'( raanbaazaar) ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजमधील प्राजक्ताच्या लूकने जणू सोशल मीडियावर आग लावली होती. तिला अनेकांच्या वाईट कमेंटचा सामना करावा लागला होता. या वेबसीरिजमध्ये तिने रत्ना हे पात्र साकारलं आहे. मात्र हे पात्र साकारणं तिच्यासाठी म्हणावं तितकं सोपं नव्हतं. या भूमिकेसाठी तिने तब्बल ११ किलो वजन वाढवलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

प्रत्येक कलाकार आपल्याला मिळालेल्या भूमिकेत तंतोतंत बसण्याचा प्रयत्न करतो. भूमिकेसाठी लागणारे प्रत्येक बदल कलाकार स्वतःमध्ये करत असतो. प्राजक्ताने देखील तिच्या भूमिकेसाठी एक दोन नाही तर तब्बल ११ किलो वजन वाढवलं होतं. आता वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर तिने पुन्हा वजन कमी करण्याचा सपाटा लावलाय. आधी तिचं वजन ६१ होतं. आता प्राजक्ताने तिच्या ट्रेनरच्या मदतीने ६ किलो वजन कमी केलं आहे. सध्या तिचं वजन ५५ किलो आहे. आपल्याला आणखी ५ किलो कमी करायचे आहेत असं तिने एक पोस्ट करत म्हटलं आहे. प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत प्राजक्ताचा रत्ना या भूमिकेतील फोटो आहे तर दुसरीकडे तिचा वजन कमी केलेला फोटो आहे.

प्राजक्ताचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरीही चकित झाले आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'वजन वाढलं किंवा कमी झालं तरी तू तेवढीच सुंदर दिसतेयस', 'आम्हाला तो ६१ किलोमध्ये सुद्धा आवडलीस', 'आम्हाला तुझा अभिमान आहे', 'खूप छान काम केलंस तू', अशा अनेक कमेंट प्राजक्ताच्या पोस्टवर आल्या आहेत.