मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनय सोडून हिमाचलमध्ये धमाल करतेय प्राजक्ता माळी, फोटो शेअर करत म्हणते...

अभिनय सोडून हिमाचलमध्ये धमाल करतेय प्राजक्ता माळी, फोटो शेअर करत म्हणते...

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 09, 2022, 01:51 PM IST

    • (prajakta mali)सध्या प्राजक्ता हिमाचल प्रदेश येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिथले काही फ़ोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करतेय.
प्राजक्ता माळी

(prajakta mali)सध्या प्राजक्ता हिमाचल प्रदेश येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिथले काही फ़ोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करतेय.

    • (prajakta mali)सध्या प्राजक्ता हिमाचल प्रदेश येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिथले काही फ़ोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करतेय.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. प्राजक्ता नेहमीच तिचे निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद देत असतात. सध्या प्राजक्ता हिमाचल प्रदेश येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिथले काही फ़ोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करतेय. हे फोटो पाहून ती हिमाचलच्या निसर्गामध्ये रमलीये असं म्हणायला हरकत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

 

नुकतेच प्राजक्ताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेत निवेदकाच्या भूमिकेत दिसत होती. मात्र या मालिकेने काही दिवसांचा ब्रेक घेतल्याने सगळ्याच कलाकारांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. याच सुट्ट्या सत्कारणी लावाव्या यासाठी ती एकटीच हिमाचल येथे फिरण्यासाठी गेली आहे. आपण पहिल्यांदाच असं फिरायला आल्याचं तिने म्हटलं होतं. मात्र आता एक पोस्ट करत आपल्याला महाराष्ट्राची आठवण येतेय अशी तक्रारही ती करतेय. पोस्ट करत प्राजक्ताने तिचे काही फोटो शेअर करत लिहलं, 'मी हिप्पी वगरे नाहीये पण हे पर्वत मला आवडतायत. पण खर सांगू., कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीक जास्त ५-६ दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते… हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय… देवा… कसं होणार माझं…'

 

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहेत. चाहतेही तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. यासोबतच प्राजक्ताच्या 'रानबाजार' या वेबसीरिजचे शेवटचे भागही उद्या प्रदर्शित होणार आहेत.

 

विभाग